ETV Bharat / state

महापालिका आयुक्तांनी केली नागरिकांची कानउघडणी

author img

By

Published : Jan 12, 2021, 9:59 PM IST

औरंगाबाद महापालिकेच्या घंटा गाडीत ओला व सुखा कचरा वेगवेगळा टाकला नसल्याने पालिका आयुक्तांनी नागरिकांची कानउघडणी केली.

रागावताना पालिका आयुक्त
रागावताना पालिका आयुक्त

औरंगाबाद - महानगर पालिकेच्या घंटा गाडीत ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा करुन न टाकतात दोन्ही कचरा एकत्रित टाकणाऱ्या नागरिकांना महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी (ता.12) कानउघडणी केली.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे गेले होते. दरम्यान, संग्रहालयाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी संग्रहालयाच्या मागे असलेल्या गरम पाणी भागातील जलतरण तलावाला भेट दिली. यावेळी कचरा संकलीत करणारी गाडी महापालिका आयुक्तांना दिसली. त्यावेळी आयुक्तांनी नागरिक कचरा वेगवेगळा टाकतात की नाही याची पाहणी केली. दरम्यान, एक नागरिक बादलीत एकत्रित कचरा घेऊन आला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी थांबवून त्या नागरिकांची चांगलीच कानउघडणी केली. महापालिका तुमच्या घरासमोर येऊन कचरा घेते. तुम्ही घरातून कचरा वेगवेगळा करुन महापालिकेला सहकार्य करणार नसाल तर महापालिका तुमचा कचरा गोळा करणार नाही, असे आयुक्त पांडे म्हणाले. यावेळी नागरिकांनी यानंतर कचरा वेगवेगळा करून महापालिकेला सहकार्य करू, असे आश्वासन महापालिका आयुक्तांना नागरिकांनी दिले.

हेही वाचा - क्वारंटाईन सेंटरमधील साहित्याची चोरी; औरंगाबाद मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश

हेही वाचा - आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.