औरंगाबाद - मागील २० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता, आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांचा विजय झाला.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत धक्का दिला. मिळालेला विजय हा औरंगाबादच्या सर्वच मतदारांचा असल्याचे इम्तियाज जलील यांनी विजय झाल्यावर सांगितले. तर खैरे यांनी माझे बॅडलक, असे म्हणत काढता पाय घेतला.
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव कारणीभूत ठरले. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2,76,000 मतं घेतल्याने खैरे यांचा पराभव झाला. तर, इम्तियाज जलील यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने काँग्रेसचे डिपॉजीट जप्त झाले. मिळालेला विजय हा सर्व औरंगाबादच्या लोकांचा असून आता शहराचा विकास करण्यासाठी काम करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.