ETV Bharat / state

Mobile Ban : आता परीक्षा केंद्रात मोबाईल बॅन; पेपर फुटीनंतर परीक्षा मंडळाची कडक नियमावली - परीक्षा केंद्र

संबंधित केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकाने बोर्डाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास आणि प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यास संबंधिताविरुद्ध अतितात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येईल, अशा सूचना दिल्या आहे.

Mobile Ban
Mobile Ban
author img

By

Published : Mar 15, 2022, 9:13 AM IST

औरंगाबाद - मोबाईलद्वारे पेपर फुटत असल्याचं लक्षात आल्यावर आता शिक्षण मंडळाने कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता वर्गात मोबाईल घेऊन जाऊ नये, कुणाकडे ही मोबाईल नसणार नाही. अगदी संबंधित स्टाफकडे सुद्धा मोबाईल असणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा मंडळाची नवीन नियमावली
परीक्षा मंडळाची नवीन नियमावली

परीक्षा सुरु असताना केंद्र संचालक विद्यार्थ्यांचे दप्तर वर्गाच्या बाहेर ठेवत नाहीत. त्याचा फायदा घेवून काही विद्यार्थी सोबत मोबाईल घेवून परीक्षा कक्षात प्रवेश करतात. तर काही विद्यार्थी परीक्षा सुरु झाल्यानंतर जाणीवपूर्वक उशिरा येतात, असे विद्यार्थी प्रश्नपत्रिका प्रसारीत करण्यास कारणीभूत ठरतात असे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा कक्षात सोडण्यात यावे. तसेच पेपर सुरु झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजेनंतर येणा-या परीक्षार्थ्यांची कडक तपासणी करण्यात यावी व त्याची उशिरा येण्याची कारणमीमांसा केल्याशिवाय त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देवू नये, असे सांगण्यात आले आहे.

याबाबतच्या सूचना संबंधितांना तात्काळ देण्यात याव्या. तसेच याकडे संबंधित केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकाने दुर्लक्ष केल्यास आणि प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यास संबंधिताविरुद्ध अतितात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येईल, अशा सूचना दिल्या आहे. परीक्षेशी संबंधित असलेल्या कोणत्याही कर्मचा-याकडे मोबाईल असता कामा नये, असे बोर्डाने पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.