ETV Bharat / state

Uday Samant Statement एकनाथ शिंदे आमचे नेते, मात्र आम्ही बाळासाहेब यांच्या शिवसेनेचे सैनिक - उदय सामंत - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड

शिंदे गटाचे आमदार ( Shinde Faction ) असे म्हणून आमचा उल्लेख करण्यात येतो, मात्र तो चुकीचे असल्याचे मत उदय सामंत ( Minister Uday Samant Statement )यांनी व्यक्त केले. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ( Balasahebanchi Shiv Sena ) सैनिक आहोत. आम्हाला निवडणूक आयोगाने तशी मान्यताही दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार म्हणने चूक आहे. एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Minister Uday Samant Statement
उद्योगमंत्री उदय सामंत
author img

By

Published : Jan 5, 2023, 4:46 PM IST

औरंगाबाद - राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा शिंदे गट ( Shinde Faction ) असा उल्लेख केला जातो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वात काम करत असलो, तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena ) आहोत. निवडणूक आयोगाने आम्हाला त्या नावाने मान्यता दिली आहे, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) यांनी व्यक्त केले.

उद्योगमंत्री उदय सामंत

संजय राऊत यांनी अशाच पत्रकार परिषद घ्याव्यात राज्यातील मनोरंजन क्षेत्र राज्याबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत ( Uday Samant Criticize To Sanjay Raut ) यांनी टीका केली. मात्र अशा टीका ते नेहमीच करतात. महिलांबाबत बोलणारे, आमचे मुडदे पाडू असे बोलणाऱ्या राऊत यांच्यबाबत काय बोलावे असा सवालही त्यांनी यावेळी केला. पुढील पंचवीस वर्षे ते असेच बोलत राहावे, अशी सदिच्छा असे म्हणत उदय सामंत यांनी टीका केली. तर बुधवारी दिवसभर अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत दोन वेगळे वक्तव्य पाहायला मिळाले. त्यामधे देशाचे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि अजित पवार आपल्या मतावर ठाम राहणे हे पाहून तुम्हाला लक्षात येईल, अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली.

मसिया प्रदर्शनाला सुरुवात मसिया तर्फे शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड ( Union Minister Bhagwat Karad ) आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आयोजित होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. तरी शेवटच्या दिवशी ते येऊ शकतात अशी शक्यता उदय सामंत यांनी वर्तवली. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संदीपान भूमरे, मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत प्रदर्षनाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

विमानात तांत्रिक बिघाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मसिया प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते. मात्र ऐन वेळेवर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला. आता मात्र हे दोघेही प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्री उदय सामंत यांनीही तशी शक्यता वर्तवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.