औरंगाबाद - महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील विविध १० हजार १२७ पदे भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाच्यावतीने ही भरती केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या रिक्त पदांची ही भरती असणार आहे. सध्या यातील 50 टक्के पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली आहे. यात प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक अशी विविध पदांचा समावेश आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा वाढवण्यासाठी या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यात आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. या जागा तातडीने भरल्यास आताची परिस्थिती हाताळण्यास मदत होईल, त्यामुळेच या जागा तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
हेही वाचा - गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन घेणे धोकादायक