औरंगाबाद - राज्यात संचारबंदी लागू झाल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत यामुळे परप्रांतीय मजूर आता गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची भीती या परप्रांतीय मजुरांना वाटत असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
गेल्या वार्षीची परिस्थिती पुन्हा येऊ नये
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजुरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. यामुळे अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी शहरात असलेले परराज्यातील मजूर आता गावाकडे निघाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कोरोना बधितांची त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढते रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. यामुळे राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. अनेक व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर परराज्यातून आलेल्या असलेल्या कामगारांचे काम बंद झाल्याने कामगाराचा गावाकडे निघाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील रेल्वे स्थानकामध्ये या परप्रांतीय मजुरांची गर्दी पाहायला मिळत आहे.परप्रांतीय मजुरांसोबत संसाराची सर्व साहित्य घेऊन ते गावाकडे निघाले आहे.
हेही वाचा - खाजगी बँकेत काम करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या