ETV Bharat / state

किती लोक मुंबईत जाणार, कोणालाच कळणार नाही - मनोज जरांगे - Maratha Reservation Issue

Maratha Reservation Issue: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीपासून आंदोलन उभारणार आहेत. (Manoj Jarange Patil) त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत किती लोकं येणार, याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे. (Maratha Agitation Mumbai) मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मुंबईत किती लोकं येणार हे कोणालाच कळणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. (Mumbai Police)

Maratha Reservation Issue
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 9:41 PM IST

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या रणनितीवर बोलताना

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation Issue: आरक्षण बाबत जो निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या. एकदा आम्ही निघालो तर थांबणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. (MLA Bacchu Kadu) आंदोलना बाबत पोलीस माहिती घेत आहेत; मात्र किती माहिती घेतली तरी त्यांना खरी माहिती मिळणार नाही असा, २६ तारखेलाच खरा प्रकार कळेल. जगात इतके आंदोलक एकाच मागणीसाठी रस्त्यावर येण्याचा विक्रम होईल असं देखील जरांगे यांनी सांगितलं.

आमदार कडू यांनी भेट घेतली: सोमवारी सकाळी आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यात पुन्हा आमची चर्चा झाली. त्यांना पुन्हा तीन शब्द जोडा, अशी विनंती केली. मागील सात महिन्यांपासून आम्ही मुदत देतोय. मात्र, अजूनही आम्हाला प्रतीक्षा करावी लागत आहे. आमच्या पुढच्या पिढीला आरक्षणाची नितांत गरज असल्यानं आमची लढाई आहे आणि आम्ही ती लढणार आहे. आता आमदार कडू यांना आमचं म्हणणं पुन्हा एकदा सांगितलं आहे. वीस तारखेपर्यंत काय करायचं आहे ते करा. मात्र एकदा चालायला लागलो तर थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. 20 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता चालायला सुरुवात करणार. जितकं चालायचं चाला, नंतर गाडीत बसून विश्रांतीच्या जागी जाणार. तिथे देव नाहीत की ज्याच्या पूजेला चालतच जायला हवं म्हणून अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

कोणाला कळणार नाही: 20 जानेवारी रोजी आम्ही आरक्षण घेण्यासाठी मुंबईला जाणार आहोत. आमच्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी पोलीस आमच्या बांधवांना फोन करून तयारीबाबत माहिती विचारत आहेत. कोणी कितीही चौकशी केली तरी आम्ही किती लोक मुंबईत जाणार हे शेवटपर्यंत कोणालाही कळणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. प्रत्येक गावातून वेगवेगळ्या मार्गानं लोकं मुंबईच्या दिशेनं निघणार. पुण्याच्या जवळ सगळे एकत्र येत जातील आणि मुंबईत आम्ही मोठ्या संख्येनं धडकू. त्याचं नियोजन कोणाला कधीच कळणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तर आंदोलनाला लोक आमचे, पैसे आमचे, नियोजन आमचं यांना काय करायचं? असा टोला देखील जरांगे पाटलांनी लगावला. कोणी तरी कोर्टात गेलंय त्याबाबत मी बोलणार नाही. त्याला कोणी विचारत नाही अशी टीका नाव न घेता मनोज जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली.

पुन्हा क्रिकेट मैदानात: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते एमजीएम मैदानावर क्रिकेटच्या सामन्यांचे उद्घाटन झाले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बॅटिंग करण्याचा आनंद घेतला. एक ओव्हर बॅटिंग त्यांनी केली. यावेळी लावलेला टोला चेंडूला होता की इतर कोणाला? अशी मिश्किल टीका त्यांनी केली.

हेही वाचा:

  1. शिवसेना आमदार अपात्र निकाल : विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
  2. चक्क क्रिकेटच्या देवाचाही डीपफेक व्हिडिओ; सचिननं दिलं स्पष्टीकरण
  3. सर्वत्र राम भक्तीची लाट; ठाण्यात राम मंदिर प्रतिकृती आणि झेंडयांना प्रचंड मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.