ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये तलवारीचा धाक दाखवून तोडले आंबे, ठेकेदाराला धमकावले - औरंगाबाद क्राईम

आंब्याच्या ठेकेदाराला तलवारीचा धाक दाखवत आंबे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रवीण सोळसे
प्रवीण सोळसे
author img

By

Published : May 14, 2021, 10:08 PM IST

Updated : May 15, 2021, 1:02 PM IST

औरंगाबाद - आंब्याच्या ठेकेदाराला तलवारीचा धाक दाखवत आंबे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना येथील हिमायतबागमधील अमराईत घडली. या व्यक्तीविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रवीण मधुकर सोळसे (वय २७, रा. भिमराज नगर, हिमायतबाग) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विनोद ज्योतिष कुंडारे यांनी हिमायतबाग येथील अमराईचा ठेका घेतलेला आहे. दरम्यान, आरोपी प्रवीण सोळसे आमराईत आंबे तोडत होता. त्याला आंबे तोडताना पाहून ठेकेदार कुंडारे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आंबे तोडणे थांबवले नाही. त्यावेळी त्याची आणि ठेकेदार कुंडारे यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर प्रवीण सोळसे घरी गेला आणि तलवार घेऊन आला. नंतर तो ठकेदाराला तलवारीचा धाक दाखवून आंबे घरी घेऊन गेला. याबाबत ठेकेदाराने बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी प्रवीण सोळसेच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्याकडे तलवार सापडली. ती तलवार जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा - सोलापूर-पुणे महामार्गावर थरार, पोलिसांवर जिवघेणा हल्ला, दरोड्यातील आरोपीला पळवण्याचा प्रयत्न

हेही वाचा- राज्यातील रुग्णवाहिकांना चंद्रपूर पॅटर्नचा दणका; परिवहन विभागाकडून भाडेदर निश्चित

Last Updated : May 15, 2021, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.