औरंगाबाद - महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. ( Devotees Crowd in Grishneshwarar Jyotirling Temple ) कोरोना काळात मंदिर गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध करण्यात आले होते. मात्र, 23 महिन्यानंतर भक्तांना देवाचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आल्याने भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. ( Mahashivratri Celebration in Aurangabad ) याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी घृष्णेश्वर मंदिरात आढावा घेत मंदिर विश्वस्त गोविंद शेवाळे आणि शिव भक्ताशी संवाद साधला.
12 ज्योतिर्लिंग मंदिरात घृष्णेश्वराचे महत्व अधिक -
भगवान शंकराने देश भरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर होय. पाहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारे घृष्णेश्वर भगवान असे मानले जाते. तर घृष्णेश्वर मंदिराचे पूर्वाभिमुख आहे. देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो. तर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होत आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करत असतात.
हेही वाचा - Shivlinga at Nagradham : नागराधाम येथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा
कोरोनामुळे दोन वर्षांनी मिळाला प्रवेश -
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये भक्तांना देवाच्या मूळ गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. सुरुवातीला सहा महिने निर्बंध लावल्या नंतर धार्मिक स्थळ भक्तांसाठी खुली करण्यात आली. मात्र, गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे एक मार्चपासून सर्व मंदिरांमध्ये भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली. 23 महिन्यानंतर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.