ETV Bharat / state

Devendra Fadnavis With Ajit Pawar : 'आधी अजितदादा पिसिंग-पिसिंग अन् आता...'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सिंचन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात पुरावे घेऊन फिरत होते. फडणवीस त्यावेळी अजित दादा चक्की पिसिंग ॲंड पिसिंग म्हणत होते. मात्र, त्यांच्यात आता किसिंग ॲंड किसिंग चालू असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी फडणवीसांना लगावला.

Kissing And Kissing
Kissing And Kissing
author img

By

Published : Aug 19, 2023, 8:42 PM IST

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. आधी देवेंद्र फडणवीस, अजितदादांना चक्की पिसिंग ॲंड पिसिंग म्हणत होते. मात्र, तेच आता अजित पवारांसोबत किसिंग ॲंड किसिंग करत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

कोणीही आले, तरी खासदार आमचाच : राज्याचं नेतृत्व गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करीत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात कितीही गुडघ्याला बाशिंग बांधले, तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच जिंकणार, असा दावा दानवे यांनी केला. जिल्ह्यात शिंदे गट लढणार की भाजपा लढणार, त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना पुरून उरणार, असं दानवेंनी म्हटलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड छान माणूस आहे. मात्र, ते चांगले नेते नाहीत. ते चांगले डॉक्टर आहेत, बालरोगतज्ञ आहेत. मात्र, ते चांगले नेतृत्व करू शकत नाही, असा टोला दानवेंनी कराडांना लगावला आहे.

किरीट सोमैयांना सर्वजण ओळखतात : दोन दिवसांपूर्वी किरीट सोमैया अचानक शहरात आले. भावना गवळी प्रकरणात किरीट सोमैया यांनी आरोप केले होते. तसेच त्यांचा सीए या प्रकरणी तुरुंगात होता. किरीट सोमैया कसे आहेत, हे तुम्ही ओळखता. किरीट सोमैया यांना शिवसेनेची भीती वाटते म्हणून त्यांनी छुप्या पद्धतीने दौरा केला. येताना दौऱ्याची माहिती दिली असती तर, ते शहरात येऊ शकले नसते, असे दानवे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांवर कारवाई झाली का? : सत्ताधारी पक्षांच्या आमदारांवर अनेक आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली का? याकडे जनतेने लक्ष द्यावं. जर एखाद्या सामान्य माणसाने असे कृत्य केले असते, तर सरकारने काय कारवाई केली असती? पोलीस सरकारच्या हाताखाली मांजर बनत असतील, सरकारचे गुलाम होत असतील तर जनता त्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असं दानवे यांनी सांगितलं.

जुन्या लोकांना टाकले : भाजपाचे ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांना भाजपा बेदखल करत असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे. भाजपात सगळे चेहरे नवीन आहेत. मूळ भाजपाचे कार्यकर्ते बोटावर मोजण्या इतके आहेत. भाजपाला मोठं करणारे कार्यकर्ते कुठं गेले?. भाजपा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे. भाजपाचे कोणते कोणते टोलनाके आहेत, हे जनतेला माहिती आहे. येणाऱ्या काळात ते समोर येतील, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

Aaditya Thackeray On BJP : घटनाबाह्य सरकारमध्ये इंपोर्ट केलेल्यांचीच चलती, आदित्य ठाकरेंचा युतीसरकारवर हल्लाबोल

Politics from NCP office : 'पाॅवर गेम', शरद पवार गटाने थाटले तंबूत कार्यालय

Sanjay Raut Criticized BJP : तुमच्या पक्षश्रेष्ठींनी युती तोडली, भाजपाचं दुकान डुप्लिकेट - संजय राऊत यांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.