ETV Bharat / state

थेरगावातील शेतात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश - paithan

थेरगाव येथील शिवारात बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन खाते आणि पोलिसांनी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर त्यांची भीती दूर झाली.

leopard caught by aurangabad forest dept
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2020, 10:10 AM IST

Updated : Apr 13, 2020, 3:22 PM IST

पैठण (औरंगाबाद)- पैठण तालुक्यातील थेरगाव येथे सकाळी 8 च्या सुमारास एका शेतकऱ्यास बिबट्या दिसला. ही माहिती पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांना कळताच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, औरंगाबाद वन खात्याला बिबट्याला पकडण्यात यश आल्यानंतर सर्वांची भीती दूर झाली.

थेरगावातील शेतात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

थेरगावमध्ये शेतकऱ्यास बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच औरंगाबादहून वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी तांबे त्यांच्या टीम सोबत घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांच्यासोबत पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक येरमे देखील पोलीस कर्मचाऱ्यांसह आले होते. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला.

बिबट्याला जेरबंद करताना पोलीस कॉन्स्टेबल काकडे यांनी मोठी हिम्मत दाखवली. यावेळी काही पत्रकार आणि वनविभागाचे कर्मचाऱ्यांना थोडी दुखापत झाली. शेवटी सर्वांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी थेरगाव गावातील युवकांनी मदत केली, त्याबद्दल वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी युवकांचे कौतुक केले. यावेळी पाचोड येथील सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. बिबट्याला सुखरुप जेरबंद करण्यात असून वन खात्यामार्फत बिबट्याची तपासणी करण्यात येणार आहे.

Last Updated : Apr 13, 2020, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.