ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिन विशेष : नव्या पिढीनं शिकून मोठं व्हावं - कडूबाई खरात यांचं आवाहन

कडूबाई खरात औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील गायरान जमिनीवर झोपडीत राहतात. लिहिता वाचता न येणाऱ्या कडूबाई यांच्या आवाजात वेगळीच जादू आहे. लहानपणापासून बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित आहेत.

author img

By

Published : Dec 5, 2020, 10:15 PM IST

Updated : Dec 6, 2020, 11:57 AM IST

KADUBAI KHARAT
कडूबाई खरात

औरंगाबाद - भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या भारताची निर्मिती करू शकतात. यासाठी त्यांचे विचार नव्या पिढीत रुजवून त्यांनी मोठ व्हावे, असे आवाहन कडूबाई खरात यांनी केले आहे. बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित झालेल्या कडूबाई खरात या राज्यभर फिरून गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे आणि त्यांचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कडूबाई यांची प्रतिक्रिया.

कडूबाई खरात औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील गायरान जमिनीवर झोपडीत राहतात. लिहिता वाचता न येणाऱ्या कडूबाई यांच्या आवाजात वेगळीच जादू आहे. लहानपणापासून बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित आहेत. बाबासाहेबांच्या विचारातून समाजातील विषमता दूर होऊन नव्या भारताची निर्मिती होईल, असा विश्वास असल्याने कडूबाईनीं समाजप्रबोधनाचा वसा घेतला. हातात एकविणा घेऊन बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित गीत त्या सादर करू लागल्या. या माध्यमातून राज्यात त्यांचा वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन - ‘कोविड–१९’च्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर 'पॅगोडा' बंद

सोशल मीडियामुळे कडूबाई प्रकाशझोतात...

काही वर्षांपूर्वी कडूबाईं राज्यातील लोकांसाठी अनोळखी होत्या. मात्र, त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून कडूबाईंची ओळख संपूर्ण राज्याला झाली. कडुबाईचे एक गाणे काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चांगले गाजले. यानंतर त्यांच्या गाण्याची आणि सादरीकरणाची चर्चा रंगली. तसेच कडूबाई कोण आहेत? त्या काय करतात? याची उत्सुकता अनेकांना लागली. त्यांना भेटण्यासाठी अनेकांनी औरंगाबाद गाठले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांना बोलावले जाऊ लागले. त्यांच्या गीतांची मागणी वाढली. काही वेळा त्यांना त्यांच्या सादरीकरणाचे मानधनही त्यांना मिळालं. बाबासाहेबांचे विचार आपल्या गायनाच्या माध्यमातून पोहोचविणाऱ्या अशिक्षित असलेल्या कडूबाई आज संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी परदेशातही अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम सादर केले. मात्र, कलेला वाव मिळाला असला तरी सरकारने हक्काचे छत मिळण्यासाठी मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नव्या पिढीने शिकून मोठं व्हावं...

कडूबाई आपल्या गाण्यांमधून युवकांना शिकून मोठे होण्याचे आवाहन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी युवकांना शिक्षित व्हा, असे सांगत. शिक्षणाने माणसाला शहाणपण येते, तो त्याची प्रगती करू शकतो, समाज घडवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षित व्हावे, यासाठी कडूबाईदेखील आग्रही असतात. बाबासाहेबानी शिक्षण घेऊन समाजातील अंधार दूर केला होता. त्यांच्या कार्याची जाणीव लोकांना करून देत. बाबासाहेबानी शिक्षण घेण्यासाठी किती संघर्ष केला, त्यामुळे तुम्हीही शिक्षण घ्या आणि मोठे व्हा, अस आवाहन कडूबाई त्यांच्या गीतांमधून सर्वांना करतात.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन

Last Updated : Dec 6, 2020, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.