औरंगाबाद - काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन राजीनामा दिला. मात्र, बागडे औरंगाबादेत असल्याने नितेश राणे यांनी मेलवर आपला राजीनामा पाठवला आणि तो स्वीकारल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी दिली.
हेही वाचा - मुख्यंमत्री फडणवीस यांना 'सर्वोच्च' झटका, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती प्रकरणी खटला पुन्हा चालणार
नारायण राणे भाजपात प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच धर्तीवर भाजपकडून आमदारकी लढवणार असल्याने नितेश राणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र राजीनामा देताना कुठलेही कारण दिले जात नाही. जर कारण दिले तर तो राजीनामा स्वीकारता येत नाही, असे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
बागडे म्हणाले, नितेश राणे यांनी राजीनामा देण्याआधी मला फोन केला होता. मुंबईच्या कार्यालयात राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मी औरंगाबादला असल्याने त्यांनी आपला राजीनामा मेलद्वारे दिला आहे. तो मी स्वीकारला असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : कर्जतचे आमदार सुरेश लाड यांचा निवडणूकीस 'ना', रायगडात राष्ट्रवादीला धक्का