ETV Bharat / state

एमआयएम विधानसभेच्या 20 टक्के जागा लढवणार - इम्तियाज जलील

author img

By

Published : Sep 21, 2019, 7:51 PM IST

Updated : Sep 21, 2019, 9:40 PM IST

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की, दोघांनी सोबत येऊन निवडणूक लढवावी. आमची देखील तीच इच्छा आहे. आम्ही एक मोठी ताकत होऊ शकतो. मात्र, यामध्ये आंबेडकरांनी आपली भूमिका बदलावी, असे जर झाले तर राज्यात आम्ही मोठी ताकत होऊन, मोठा भूकंप घडू शकतो, अशी आशा देखील इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली.

खासदार इम्तियाज जलील

मुंबई - वंचित बहुजन आघाडीसोबत जर आघाडी झाली नाही. तर एमआयएम राज्यामध्ये 20 टक्के जागा लढवेल, अशी माहिती एमआयएमचे खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली. अद्यापही आमची वंचितसोबत जाण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा, असे देखील जलील म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील

हेही वाचा - मराठवाडा - आघाडीला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान; आढावा....

यावेळी जलील म्हणाले, की वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की, दोघांनी सोबत येऊन निवडणूक लढवावी. आमची देखील तीच इच्छा आहे. आम्ही एक मोठी ताकत होऊ शकतो. मात्र, यामध्ये आंबेडकरांनी आपली भूमिका बदलावी, असे जर झाले तर राज्यात आम्ही मोठी ताकत होऊन, मोठा भूकंप घडू शकतो, अशी आशा देखील इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली.

भाजप निवडणुकीच्या काळामध्ये अशा काही घटना घडवून आणतो, ज्यामुळे विकासाचे मुद्दे हे बाजूला सरकतात. इतकेच नाही तर जनता देखील त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली नाही, तर बरे होईल अशी भीती देखील जलील यांनी बोलून दाखवली. निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी घटना घडवायच्या आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, अशी भूमिका भाजपचे असते, असा आरोप जलील यांनी केला.

हेही वाचा - कन्नड तालुक्यातील बनशेद्रामध्ये तलावात बुडून दोघांचा मृत्यू

विधासभा निवडणूक 2014 मध्ये आम्ही 11 नगरसेवक असताना 24 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली होती. तर 2019 ला आमचे 1 खासदार 2 आमदार आणि 150 च्या वर नगरसेवक आहेत. इतकेच नाही तर आमचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अशा अनेक पदांपर्यंत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आता काम करत आहेत. आमचा पक्ष आता गावागावात जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आमची ताकद निश्चितच वाढली असून राज्यात 288 जागांवर विधानसभा निवडणूक होत असल्या तरी आम्ही पूर्ण जागा कदापी लढणार नाही. आम्ही या पैकी 20 टक्के जागा या लढवणार आहोत. कमी जागा लढवायच्या आणि जास्त जागा जिंकून आणायच्या असा आमचा उद्देश आहे.

ज्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे. त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत, वंचितसोबत जाण्यास आम्ही अजूनही तयार आहोत मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यायला हवा. इतक्या दिवस ओबीसींनी या सर्व तरतुदीबाबत वाट पाहिली होती, असे देखील इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Intro:वंचित सोबत जर आघाडी झाली नाही तर एमआयएम हा राज्यांमध्ये 20 टक्के जागा लढवेल अशी माहिती एमआयएमचे खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली. अद्यापही आम्ही वंचित सोबत जाण्याची इच्छा आहे मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा असे देखील चल म्हणाले.Body:वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की दोघांनी सोबत येऊन निवडणूक लढवावी. आमची देखील तीच इच्छा आहे. आम्ही एक मोठी ताकत होऊ शकतो मात्र यामध्ये आंबेडकरांनी आपली भूमिका बदलावी, असं जर झालं तर राज्यात आम्ही मोठी ताकत होऊन, मोठा भूकंप घडू शकतो अशी आशा देखील इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली.Conclusion:भाजप निवडणुकीच्या काळामध्ये अशा काही घटना घडवून आणतो ज्यामुळे विकासाचे मुद्दे हे बाजूला सरकतात. इतकंच नाही तर जनता देखील त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची व्हावा ही त्यांचे भक्त सुरु करतात, अशी कुठलीही घटना घडली नाही तर बरं होईल अशी भीती देखील इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली. निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी घटना घडवायच्या आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची अशी भूमिका भाजपचे असते. असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. 2014 साली आम्ही 11 नगरसेवक असताना 24 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली होती. 2019 ला आमचा एक खासदार दोन आमदार आणि दीडशेच्या वर नगरसेवक आहेत इतकंच नाही तर आमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशा अनेक पदांपर्यंत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आता काम करत आहेत. आमचा पक्ष आता गावागावात जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आमची ताकद निश्चितच वाढली असून राज्यात 288 जागांवर विधानसभा निवडणूक होत असल्या तरी आम्ही पूर्ण जागा कदापि लढणार नाही. आम्ही या पैकी 20 टक्के जागा या लढवणार आहोत. कमी जागा लढवायच्या आणि जास्त जागा जिंकून आणायच्या असा आमचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत वंचित सोबत जाण्यास आम्ही अजूनही तयार आहोत मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यायला हवा इतक्या दिवस ओबीसींनी या सर्व तरतुदीबाबत वाट पाहिली होती असे देखील इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
Byte - इम्तियाज जलील
Last Updated : Sep 21, 2019, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.