ETV Bharat / state

औरंगाबाद : चिमुकल्यांसमोरच वडिलांनी केली आईची हत्या - औरंगाबाद गुन्हे वार्ता

पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

husband killed his wife in front of children in aurangabad
औरंगाबाद : चिमुकल्यांसमोरच वडिलांनी केली आईची हत्या
author img

By

Published : Feb 17, 2021, 12:53 AM IST

औरंगाबाद - पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कविता त्रिवेदी ( 32) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर सिद्धेश त्रिवेदी असे पतीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली असून पती सिद्धेश त्रिवेदी फरार आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

चिमुकल्यासमोर झाली हत्या -

कविता आणि सिद्धेश यांना दोन मुले आहेत. रुद्रा 7 वर्षाचा आहे, तर त्रिशा 3 वर्षाची आहे. मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास रुद्रासमोर सिद्धेशने कविताच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला आणि नंतर डोक्यात दगड घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून रुद्रा निशब्द झाला. खून केल्यावर सिद्धेश बेडरूममधून बाथरूममध्ये गेला. त्यावेळी त्याच्या पायाचे ठसे स्वयंपाक घरात उमटले होते.

दिवसभर मृत आई शेजारी खेळली मुले -

सिद्धेशने पत्नीची हत्या केल्यावर तो घरातून निघून गेला. जात असताना त्याने घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवत लोखंडी जाळीचे दार बाहेरून लावून घेतले. दोन्ही चिमुकली रात्रभर मृत आईच्या शेजारी खेळत राहिली. छोटी त्रिशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बिलगून झोपली होती. त्यामुळे त्रिशाच्या अंगालादेखील रक्त लागले होते. आपली आई जगात नाही, याची भनकदेखील लागली नसल्याने मुले दिवसभर घरात खेळत राहिली. त्यांनी घरात बसून टीव्ही पहिला. टीव्हीचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांना घरात कविताचा खून झाला असल्याच कळले नाही. सायंकाळी मात्र मुले रडू लागल्याने शेजाऱ्यांनी घरात धाव घेतल्याने ही घटना उघडकीस आली.

नुकताच साजरा केला होता व्हॅलेंटाईन डे -

सिद्धेश कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करत असल्याची प्राथमिक महिती समोर आली आहे. सिद्धेश आणि कविताने दोन दिवसांपूर्वी व्हॅलेंटाईन-डे उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे 11 तारखेला रुद्राचा वाढदिवस साजरा केला. एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यांच्यात वाद आणि भांडणाचे कारण समजले नाही. कविताचा खून केल्यावर सिद्धेश फरार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.