ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Aurangabad Crime news

मागील अनेक महिन्यापासून अत्यंत गुप्त पद्धतीने बीड बायपास परिसरातील राजेशनगर भागात एका बंगल्यात आणि दुसऱ्या रो-हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

High profile sex racket exposed
औरंगाबादमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Dec 8, 2019, 7:42 PM IST

औरंगाबाद - उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो हाऊसमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेश्या, दलालांसह 3 ग्राहकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉलच्या मॅनेजरचा समावेश आहे. ही कारवाई बीड बायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली.

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कविता जाधव, उषा ठाकूर (राजपूत) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 2 महिलांची नावे आहेत. तर हा अड्डा चालवणारा संजय कापसे, ग्राहक घेऊन येणारे अजय साळवे, विनोद नागवणेसह ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉल मॅनेजर मोहम्मद अर्षद, अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गरड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - आईच्या हत्येमुळे मुले झाली अनाथ; वर्दीतल्या माणसांमुळे मिळाला आधार

मागील अनेक महिन्यापासून अत्यंत गुप्त पद्धतीने बीड बायपास परिसरातील राजेशनगर भागात एका बंगल्यात आणि दुसऱ्या रो-हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून एका पथकाने शनिवारी राजेशनगरमध्ये सापळा रचला. त्यानुसार नंदिनी हॉटेलच्या मागे असलेल्या एका रो-हाऊस मध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये संजय कापसे, मोहम्मद अर्षद, अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गराड, दलाल अजय साळवे, अड्डा चालवणारी कविता जाधव यांना अटक करण्यात आली. या ठिकाणाहून 3 वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली.

तर दुसरी कारवाई ही मराठमोळा हॉटेलच्या मागे काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात छापा मारून केली. यावेळी नागवणे व उषा ठाकूर-राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले. तर या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - कॉल करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून एकाची डोके दगडाने ठेचून हत्या

दारूचा साठाही पोलिसांनी केला जप्त -

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 10 दारूचे बॉक्स जप्त केले.

परराज्यातील तरुणींकडून देहव्यापार -

कुंटनखण्यावर आसाम, हैदराबाद, कर्नाटक अशा विविध राज्यातील तरुणी पोलिसांना आढळल्या. अटक करण्यात आलेल्या महिला तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घ्यायच्या. यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून 3 हजार ते 5 हजार रुपये असा दर ठरवण्यात आला होता.

Intro:उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो हाऊस मध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेला हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चा गुन्हे शाखेने परदा फाश करीत दलाल अँटी सह 3 ग्राहकांना अटक केली आहे.धक्कादायक बाब म्हणजेया वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेली ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉलचा म्यानेजरचा समावेश आहे.ही कारवाई बीडबायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली.
Body:
कविता जाधव ,उषा ठाकूर(राजपूत) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन अटींची नावे आहे तर हा अड्डा चालवणारा संजय कापसे, ग्राहक घेऊन येणारे दोन पंटर अजय साळवे, विनोद नागवणे, सह ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉलचा म्यानेजर मोहम्मद अर्षद, अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गरड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत..
मागील अनेक महिन्यापासून अत्यन्त गुप्त पद्धतीने बीडबायपास परिसरातील राजेशनगर भागात एक बंगल्यात आणि दुसरा रो-हाऊस मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.त्यावरून एका पथकाने शनिवारी राजेशनगर मध्ये सापळा रचला व नंदिनी हॉटेल च्या मागे असलेल्या एका रो-हाऊस मध्ये अगोदर छापा मारण्यात आला तेथून अड्डा चालक संजय कापसे, व ग्राहक मॉल चा म्यानेजर मोहम्मद अर्षद ,अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गराड, दलाला अजय साळवे, अड्डा चालवणारी अँटी कविता जाधव यांना अटक करण्यात आली. तेथून तीन वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीची सुटका करण्यात आली. घटनस्थळावरून पोलिसांना मोठ्या प्रमाणात क्वांडोम चा साठा आढळला. तर दुसरी कारवाई ही मराठमोळा हॉटेल च्या मागे काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात छापा मारला असता तेथून पंटर नागवणे व अँटी उषा ठाकूर-राजपूत यांना ताब्यात घेऊन एका तरुणीची सुटका करण्यात आली.. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व आरोपिना आज दुपारी न्यायालया समोर सादर करण्यात येणार आहे.
--------------------------
दारूचा मोठा साठा पोलिसांनी केला जप्त

ज्या वेळी व्यश्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी घरा मध्ये वविदेशी दारूच्या 10 बॉक्स पोलिसांना आढळून आला.
----------------------------
परराज्यातील तरुणी कडून देहव्यापार

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कुंटनखण्यावर आसाम, हैदराबाद, कर्नाटक अशा विविध राज्यातील तरुणी पोलिसांना आढळल्या अटक करण्यात आलेली अँटी या तरुणी कडून वेश्याव्यवसाय करवून घ्यायची.या साठी प्रत्येक ग्राहकाकडून तीन हजार ते पाच हजार रुपये असा दर ठरविण्यात आला होता.

बाईट- मधुकर सावंत, पो निरीक्षक, गुन्हेशाखाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.