ETV Bharat / state

माझा फोन टॅप केला जातोय, मला संपर्क करू नका; हर्षवर्धन जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - हर्षवर्धन जाधव व्हिडिओ

नुकतेच त्यांनी सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे मी आत्महत्या करेल, असा इशारा दिला होता. इतकेच नाही तर मी जर आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी रावसाहेब दानवे जबाबदार राहतील, असेही ते म्हणाले होते. यावरून रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

harshvardhan jadhav new video  harshvardhan jadhav alleges raosaheb danve  harshvardhan jadhav and raosaheb danve dispute  हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे वाद  हर्षवर्धन जाधव व्हिडिओ  हर्षवर्धन जाधवचे रावसाहेब दानवेवर आरोप
माझा फोन टॅप केला जातोय, मला संपर्क करू नका; हर्षवर्धन जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
author img

By

Published : May 30, 2020, 7:13 PM IST

Updated : May 30, 2020, 7:59 PM IST

औरंगाबाद - कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा फोन टॅप केला जात आहे. माझ्याशी संपर्क करू नका, तुम्हाला ही त्रास होईल, असे हर्षवर्धन जाधव त्यांचे मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांना सांगत आहेत.

माझा फोन टॅप केला जातोय, मला संपर्क करू नका; हर्षवर्धन जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नुकतेच त्यांनी सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे मी आत्महत्या करेल, असा इशारा दिला होता. इतकेच नाही तर मी जर आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी रावसाहेब दानवे जबाबदार राहतील, असेही ते म्हणाले होते. यावरून रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबीक वाद आहेत. संजनाला आमदार करायचे हे ठरला आहे. त्यासाठी तिने मतदारसंघात जाऊन काम केले पाहिजे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मतदारसंघांमध्ये ज्या लोकांना मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. संजनाने वडिलांकडून मदत घेऊन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य संदर्भात मदत केली पाहिजे, अशा कामातून तिची ओळख निर्माण होईल, असा सल्ला देखील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्नी संजना जाधव यांना दिला आहे.

रावसाहेब दानवे यांनी मोदीचा व कमळाचा फोटो बाजूला काढून लोकसभा निवडणूक लढवावी व निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देखील केले आहे. लोकांना काम असतील ती त्यांनी संजनाला सांगावी. मला संपर्क करू नये. त्यांनी मला संपर्क केला तर ते अडचणीत येतील. माझे सासरे केंद्रीय मंत्री आहेत, जिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. कोणत्याही वेळी पोलीस तुमच्याकडे येऊन त्रास देतील. त्यामुळे मला फोन करू नका, असे जाहीर आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले. याबाबत व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी समाज माध्यमावर प्रसारित केला आहे.

Last Updated : May 30, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.