ETV Bharat / state

उद्योगांसह पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार - सुभाष देसाई

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नियोजन आढावा बैठक घेतली. या बैठकित जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांसोबत बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योजकांशी चर्चा केली, असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री म्हणाले. ते औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई

author img

By

Published : Jan 20, 2020, 4:57 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी नियोजन आढावा बैठक घेतली. यात जिल्ह्यासाठी २६५ कोटींपेक्षा जास्त निधी मागणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. शहरातील काही प्रश्नांबाबत आढावा घेतला असल्याचे ते म्हणाले. घाटी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत 26 जानेवारीला बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करू, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई

जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांसोबत बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योजकांशी चर्चा केली, ऑरिक सिटीला भेट दिली आहे. शेती आधारित उद्योगात ज्याची गरज आहे, अशा शेती उत्पादनांची मूल्यवाढ झाली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग वाढावे यासाठी टाटा समूहांसह इतर उद्योजकांनी मान्य केले आहेत. ऑरिक सिटीत ५०० एकर फूड मार्कचे लवकरच भूमिपूजन करू, अशी माहिती यावेळी पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, औरंगाबादच्या पर्यटनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लवकरच औरंगाबाद दौरा आणि अडचणींबाबत चर्चा करणार आहोत. अजिंठा-येरुळ महोत्सवाबाबत नियमितता आणण्यासाठीही प्रयत्नशील आहोत. अवकाळी पावसामुळे शाळेच्या इमारतींचे नुकसान झाले, त्या चांगल्या कराव्यात यासाठी निधी वाढवून मागणार असून त्यासाठी काही सामाजिक संस्थांचा सहभागही घेणार आहोत. आता जिथे काम चालू आहे किंवा झाले आहे त्यांच्या अहवालात तफावत आढळून आल्यास वेळ काढून स्वतः प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून दोषींवर कारवाई करणार आहे.

औरंगाबादच्या मकबरा रस्त्याबाबत आलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती पहिली असता त्यात तफावत आढळुन येते. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर दोष निश्चित करण्यात येईल. पैशांचा अपव्यय सहन करणार नाही, असे देसाई यांनी सांगितले. उर्दू शाळांना शिक्षक नसल्याची तक्रार मिळाली होती, त्याबाबत त्या विभागाला सूचना केल्या आहेत. मात्र, टीईटी पात्र शिक्षक मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. शिक्षक मिळावी यासाठी टीईटीच्या काही अटी शिथिल करून भरती करा अशा सूचना केल्या असल्याचे देसाई म्हणाले.

औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या ठेक्यावरून मारहाण केल्याबाबत शिरसाठ आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी वर्तमान पत्रात वाचलं आणि बरंच ऐकलं, त्यामुळे त्यात तातडीने लक्ष घातलं असून आज सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - आमदार संजय शिरसाठ व उपमहापौर जंजाळने शिवसेनेच्या ठेकेदारास बदडले, गुन्हा दाखल

औरंगाबादच्या सातारा परिसरात मुलीची छेडछाड करत असताना व्हिडिओ तयार करण्यात आला त्याबाबत पोलिसांशी चर्चा केली आहे. मुलींच्या सुरक्षेकरता शालेय बसमध्ये महिला मार्शल असणे गरजेचे आहे. शाळांनी ते सक्तीचं करावं, अशा सूचना दिल्या आहेत. जर कोणी तसे केलं नाही तर त्याबाबत कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरणही पालकमंत्री देसाई यांनी दिले.

हेही वाचा - विकृतीचा कळस! बसचालकाकडून मुलीचा विनयभंग, व्हिडिओ करुन ठेवला स्टेट्स

Intro:औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नियोजन आढावा बैठक घेतली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी 265 कोटींपेक्षा जास्त निधी मागणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. शहरातील काही प्रश्न आहेत, त्याबाबत आढावा घेतला असून घाटी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत 26 जानेवारी रोजी बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करू अस देसाई यांनी सांगितलं.

Body:जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांसोबत बैठक घेतली, माहिती तंत्रज्ञान यात गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योजकांशी चर्चा केली, ऑरिक सिटी ला भेट दिली आहे. शेती आधारित उद्योग ज्याची गरज आहे, शेती उत्पादनाची मूल्य वाढ झाली पाहिजे, माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग वाढावे यासाठी टाटा समूह यासह इतर उद्योजकांनी मान्य केले आहेत. ऑरिक सिटीत 500 एकर फूड मार्कच लवकरच भूमिपूजन करू. अशी माहिती सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत दिली.

Conclusion:औरंगाबादच्या पर्यटन बाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत लवकरच औरंगाबाद दौरा आणि अडचणी याबाबत चर्चा करणार आहोत, अजिंठा - येरुळ महोत्सव बाबत नियमितता आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे शाळेच्या इमारतीच नुकसान झालं त्या चांगल्या कराव्यात यासाठी निधी वाढवून मागणार त्यासाठी काही सामाजिक संस्थांचा सहभाग घेणार आहोत. आता जिथे काम चालू आहे किंवा झाले आहे त्यांच्या अहवालात तफावत आढळून आल्यास वेळ काढून स्वतः प्रत्यक्षात जाऊन पाहणी करणार आहे. आणि दोषींवर कारवाई करणार आहे. औरंगाबादच्या मकबरा रस्याबाबत आलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती पहिली असता त्यात तफावत आढळुन येते, त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करून त्यावर दोष निश्चित करण्यात येईल, पैश्याचाअपव्यय सहणं करणार नाही अस सुभाष देसाई यांनी सांगितलं. उर्दू शाळांना शिक्षक नसल्याची तक्रार दिली होती, त्याबाबत त्या विभागाला सूचना केल्या आहेत मात्र टीईटी पात्र शिक्षक मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. शिक्षक मिळावी यासाठी टीईटी च्या काही अटी शिथिल करून भरती करा अश्या सूचना केल्या आहेत असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या ठेक्यावरून मारहाण केल्याबाबत शिरसाठ आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला या प्रकरणी वर्तमान पत्रात वाचलं आणि बरंच ऐकलं त्यामुळे मी तातडीने लक्ष घातलं, आज सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे. अस देखील देेेसाई
यांनी सांगितलं.

औरंगाबादच्या सातारा परिसरात मुलीची छेडछाड करत असताना व्हिडीओ तयार करण्यात आला त्याबाबत पोलिसांशी चर्चा केली आहे. शालेय बस मध्ये महिला मार्शल असणे गरजेचे आहे. शाळांना तस सक्तीचं करावं अश्या सूचना दिल्या आहेत, जर कोणी तस केलं नाही तर त्याबाबत कारवाई केली जाईल. अस स्पष्टीकरण पालकमंत्रक देसाई यांनी दिल.

Byte - सुभाष देसाई - पालकमंत्री औरंगाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.