ETV Bharat / state

'गुगल पे'द्वारे व्यापाऱ्याची फसवणूक

आजकाल सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. मात्र, व्यवहार करत असताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना औरंगाबादेत घडली असून एका व्यापाऱ्याला गुगल पेद्वारे तब्बल ३० हजारांना लुबाडण्यात आले आहे.

संदीप रणधीर
author img

By

Published : Jun 27, 2019, 3:51 PM IST

औरंगाबाद - आजकाल सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. मात्र, व्यवहार करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबादेत घडला आहे. येथे एका व्यापाऱ्याची 'गुगल पे'वरून व्यवहार करत तब्बल ३० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे.

आपली व्यथा मांडताना व्यापारी संदीप रणधीर

संदीप रणधीर, असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचा फायबरचे दरवाजे तयार करण्याचा व्यवसाय असून २६ जूनला एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यासोबत मोबाईलवर व्यवहार केला. गुगल पेवरून कामाचा अॅडव्हान्स देण्याचे सांगत काही रिक्वेस्ट पाठवल्या. रिक्वेस्ट मान्य केल्यावर खात्यावर पैसे जमा होण्याऐवजी पैसे वजा झाल्याचे लक्षात आले. या व्यवहारात तब्बल तीस हजारांची फसवणूक संदीप रणधीर यांची झाली.

संदीप रणधीर हे छोटे व्यावसायिक आहेत. फायबरचे दरवाजे बनवण्याचा त्यांचा छोटा कारखाना आहे. २६ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण बांधकाम व्यवसायिक असून आपल्याला काही दरवाजे तातडीने हवे आहेत, असे सांगितले. फोनवर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर दरवाजाचे भाव ठरविण्यात आले आणि ऑर्डर नक्की करण्यात आली. जवळपास ९० हजारांचे दरवाजे घेण्याचा सौदा ठरला त्यानुसार संदीप रणधीर यांनी समोरच्या व्यक्तीला अॅडव्हान्स मिळाल्यावर काम करू, असे सांगितले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने ५० हजार रुपये अॅडव्हान्स देणार, असे सांगून काम त्वरित करा असेदेखील सांगितले.

त्यानंतर समोरच्या व्यक्तीने संदीप रणधीर यांना आपण गुगल पे द्वारे अॅडव्हान्स पाठवत असल्याचे सांगितले. फोन चालू ठेवा तुम्हाला पैशांच्या बाबतीत रिक्वेस्ट येतील त्या अॅक्सेप्ट करा. आपल्याला पैसे मिळून जातील, असे देखील त्यांनी सांगितले. त्यानुसार संदीप यांच्या गुगल पे या अप्लिकेशनमध्ये पाच-पाच हजाराचे मेसेजेस यायला सुरुवात झाली. त्यांनी आलेले सर्व मेसेज एक्सेप्ट केले. जवळपास पाच - पाच हजाराचे सहा मेसेज त्यांना प्राप्त झाले आणि त्यांनी ते सर्व स्वीकारल्यादेखील. मात्र, त्याच वेळेस त्यांना काहीतरी चुकीचे घडत आहे, अशी शंका आली. लागलीच त्यांनी आपली बँक खाती तपासली त्यामध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्या ऐवजी वजा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अजून चार वेळेस पाच - पाच हजाराच्या रिक्वेस्ट त्यांना त्यांच्या गुगल पे ऍप्लिकेशनवर आल्या. मात्र, त्यांनी त्या चारही नाकारल्या. इतकेच नाही तर संबंधित व्यक्तीला फोन देखील केला. मात्र, त्यांनी तो फोन बंद करून ठेवला होता. आपली फसवणूक झाल्याचे कळतात संदीप रणधीर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत आपली तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असला तरी देखील ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करताना आपली फसवणूक होऊ नये. यासाठी काळजी घेण्याचे आवाहन संदीप रणधीर यांनी केले.

Intro:आजकाल सर्वच व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. मात्र व्यवहार करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबादच्या व्यापाऱ्याला गुगल पे वरून व्यवहार करत असताना तब्बल तीस हजारांची फसवणूक झाली आहे.

Body:संदीप रणधीर हे व्यावसायिक आहेत. फायबरचे दरवाजे करण्याचा त्यांचा व्यवसाय असून 26 जूनला एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यासोबत मोबाईलवर व्यवहार केला. गुगल पे वरून कामाचा ऍडव्हान्स देण्याच सांगत काही रिक्वेस्ट पाठवल्या. रिक्वेस्ट मान्य केल्यावर खात्यावर पैसे येण्याऐवजी पैसे वजा झाल्याच लक्षात आलं. या व्यवहारात तब्बल तीस हजारांची फसवणूक संदीप रणधीर यांची झाली.

Conclusion:संदीप रणधीर हे छोटे व्यावसायिक आहेत. फायबरचे दरवाजे बनवण्याचा त्यांचा छोटा कारखाना आहे. 26 जून रोजी दुपारी 12 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून पण बांधकाम व्यवसायिक असून आपल्याला काही दरवाजे तातडीने हवे आहेत असं सांगितलं. फोनवर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर दरवाजांचे भाव ठरविण्यात आले आणि ऑर्डर नक्की करण्यात आली. जवळपास 90 हजारांची दरवाजे घेण्याचा सौदा ठरला त्यानुसार संदीप रणधीर यांनी समोरच्या व्यक्तीला ॲडव्हान्स मिळाल्यावर काम करू असं सांगितलं. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपण पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स आपल्याला देत असून आपण काम त्वरित करा असे देखील सांगितलं. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने संदीप रणधीर यांना आपण आपला ऍडव्हान्स हा गुगल पे द्वारे पाठवत असल्याचं सांगितलं. फोन चालू ठेवा तुम्हाला पैशांच्या बाबतीत रिक्वेस्ट येतील त्या एक्सेप्ट करा आपल्याला पैसे मिळून जातील असे देखील त्यांनी सांगितलं. त्यानुसार संदीप मंदिर यांच्या गुगल पे या अप्लिकेशन मध्ये पाच - पाच हजाराचे मेसेजेस यायला सुरुवात झाली त्यांनी आलेले सर्व मेसेज एक्सेप्ट केले. जवळपास पाच - पाच हजाराचे सहा मेसेज त्यांना प्राप्त झाले आणि त्यांनी ते सर्व स्वीकारल्या देखील मात्र त्याच वेळेस त्यांना काहीतरी चुकीचं घडतंय अशी शंका आली आणि त्यांनी आपला बँकेतली खातं तपासलं त्यामध्ये आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची वजा होत असल्याचं त्यांना आढळून आलं. त्यानंतर अजून चार वेळेस पाच - पाच हजाराच्या रिक्वेस्ट त्यांना त्यांच्या गुगल पे ॲप्लिकेशन वर आल्या मात्र त्यांनी त्या चारही नाकारल्या. इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीला फोन देखील केला मात्र त्यांनी तो फोन बंद करून ठेवला होता आपली फसवणूक झाल्याचे कळतात संदीप रणधीर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत आपली तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असला तरी देखील ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन संदीप रणधीर यांनी सर्वांना केल.
byte - संदीप रणधीर - फसवणूक झालेले व्यावसायिक
(vis ला voice over दिलेला आहे)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.