ETV Bharat / state

औरंगाबादेत क्रूरतेचा कळस: बिडकीन तालुक्यात चार दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक बलात्कार - Bidkin crime case

दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे

दोन महिलांवर दरोडेखोरांच्या सामूहिक बलात्कार

author img

By

Published : Oct 20, 2021, 4:52 PM IST

Updated : Oct 20, 2021, 6:25 PM IST

औरंगाबाद - दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने पैठण तालुक्याच्या बिडकीन येथील तोंडुळी वस्तीवर हल्ला केला. यावेळी दरोडेखोरांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

दरोडेखोरांनी महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. बिडकीन येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पीडित महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बिडकीन तालुक्यात चार दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा-धक्कादायक! नशेसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दगडाने ठेचून मामेभावाची हत्या

7 ते 8 दरोडेखोरांचा हल्ला
मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांनी तोंडुळी येथील शेतवस्तीवर हल्ला चढविला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली. त्यांना बांधून ठेवत घरातील 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

हेही वाचा-पत्नीसाेबत असलेल्या युवकावर पतीने केला प्राणघातक हल्ला; मुख्य बाजारपेठेतील माॅलमधील घटना

दरोडेखोरांची पुरुषांना बेदम मारहाण
दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पुढील तपास बिडकीन पोलीस आणि ग्रामीण पोलीस करत आहेत.

हेही वाचा-विमानामध्ये अभिनेत्रीचा विनयभंग, व्यावसायिक आरोपीला अटक

Last Updated : Oct 20, 2021, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.