औरंगाबाद - योगी सरकारच्या काळात लोकांवर अत्याचार केला जात आहे. त्यामुळेच योगी सरकार बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध करताना ते बोलत होते.
बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे भारतात विरोधक हाथरस घटेनेबाबत राजकारण होत असल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला. हा आरोप चुकीचा आहे. त्या पीडित मुलीचा रात्रीतून अंत्यविधी करण्यात आला. कोरोनाग्रस्तांचा अंतविधी करतात तसा अंतविधी पीडितेचा का केला?, असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.सुशांतच्या प्रकरणी मुंबई पोलिसांवर भाजपकडून चिखलफेक करण्यात आली. सीबीआयचे पथक पाठवले त्यांनी काय तपास केला. नुसते चहापाणी घेऊन गेले. या परिस्थितीवर बोलले पाहिजे. उद्धव ठाकरे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. काही लोक विनाकारण काहीही बोलण्याचे काम करत आहेत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर केली.
योगी सरकारला राजीनामा मागणाऱ्यांनी स्वतः राजीनामे दिले पाहिजे, अशी टीका विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोपही केला होता. त्यावर खैरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल. ते काही विनाकारण आरोप करत आहेत. काही अभ्यासपूर्ण आरोप केले पाहिजेत अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
हेही वाचा - औरंगाबाद : राहुल गांधी यांच्याशी झालेल्या धकाबुक्कीचा काँग्रेसने केला निषेध