ETV Bharat / state

निवडणुकीत पडण्यापेक्षा मी मेलो का नाही? चंद्रकांत खैरे औरंगाबादमध्ये भावुक - loksabha election

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमने पराभव केला. चंद्रकांत खैरे पाचव्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. मी खासदार असताना काम केली नाही अशी ओरड केली गेली. मात्र, माझ्याकडे कामाची यादी आहे. माझी काय चूक झाली? आता अनेकजण रडत आहेत, पण आता काय करणार.

निवडणुकीत पडण्यापेक्षा मी मेलो का नाही? चंद्रकांत खैरे औरंगाबादमध्ये भावुक
author img

By

Published : Jun 8, 2019, 9:40 PM IST

Updated : Jun 9, 2019, 3:27 PM IST

औरंगाबाद - निवडणुकीत पडण्याऐवजी मी मेलो का नाही? असा संवेदनशील प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना विचारला. माझे काय चुकले शिवसैनिक का नाराज झाला, असा प्रश्न उपस्थित करत, मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो. या निवडणुकीनंतर देशात शिवसेनेचा प्रचारक म्हणून काम करणार होतो. मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे हे बोलून दाखवले होते, असे मत खैरे यांनी उपस्थित केले.

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा ३४ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, मनीषा कायंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

निवडणुकीत चंद्रकांत खैरे औरंगाबादमध्ये भावुक

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमने पराभव केला. चंद्रकांत खैरे पाचव्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. मी खासदार असताना काम केली नाही अशी ओरड केली गेली. मात्र, माझ्याकडे कामाची यादी आहे. माझी काय चूक झाली? आता अनेकजण रडत आहेत, पण आता काय करणार. पराभवानंतर मातोश्रीवर गेलो त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे देखील भावनिक झाल्या होत्या.

त्यावेळी मी म्हणालो होतो की, 'झालं ते झालं सर्वाना माफ करा.' कळायला हवं होत. मात्र, आता शिवसेनेची बैठक घेऊन बदल केले पाहिजे अशी भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. मी निवडणून आलो असतो तर शहराला मंत्रिपदाचा मान मिळणार होता, तो आता गेला. ज्यांना मोठे केले तेच लोक विरोधात गेले. शिवसेनेचा नेता हे मोठे पद असून काही चुकले असल्यास माफ करा असे म्हणत खैरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Intro:निवडणुकीत पडण्याऐवजी मी मेलो का नाही असा संवेदनशील प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना विचारला. माझं काय चुकलं शिवसैनिक का नाराज झाला असा प्रश्न उपस्थित करत, मी हि शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि त्यानंतर देशात शिवसेनेचा प्रचारक म्हणून काम करणार होतो आणि मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे बोलून दाखवली होती असं मत खैरे यांनी उपस्थित केलं. Body:औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचा ३४ व वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनीषा कायंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. Conclusion:लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमने पराभव केला. चनद्रकांत खैरे पाचव्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. मी खासदार असताना काम केली नाही अशी ओरड केली गेली मटार माझ्याकडे कामाची यादी आहे. माझी काय चूक झाली? आता अनेक जण रडत आहेत पण आता काय करणार. पराभवानंतर मातोश्रीवर गेलो त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे देखील भावनिक झाल्या होत्या. त्यावेळी मी म्हणालो होतो कि झालं ते झालं सर्वाना माफ करा. कळायला हवं होत. मात्र आता शिवसेनेची बैठक घेऊन बदल केले पाहिजे अशी भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. मी निवडणून आलो असतो तर शहराला मंत्रिपदाचा मान मिळणार होता मात्र तो आता गेला. ज्यांना मोठं केलं तेच लोक विरोधात गेले. शिवसेनेचा नेता हे मोठं पद असून काही चुकलं असल्यास माफ करा असं म्हणत खैरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Last Updated : Jun 9, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.