ETV Bharat / state

Harshvardhan Jadhav On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळेच...; हर्षवर्धन जाधवांचा गौप्यस्फोट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव देऊनही त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्याने बीआरएस पक्षात गेलो, अशी माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याने आपण बीआरएस पक्षात गेलो, असे जाधव यांनी सांगितले.

Harshvardhan Jadhav On Uddhav Thackeray
हर्षवर्धन जाधव
author img

By

Published : Mar 25, 2023, 10:37 PM IST

Updated : Mar 25, 2023, 11:01 PM IST

हर्षवर्धन जाधव गौप्यस्फोट करताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार घेऊन सरकार पाडलं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती वाढली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा असल्याने पुढील निवडणुकीत लोकसभेला चंद्रकांत खैरे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली. त्याबाबत उपनेते गजानन घोलप यांना संपर्क साधला. अनेक वेळा त्यांच्यासोबत चर्चा देखील झाली. इतकेच नाही तर माझ्या कन्नड मतदारसंघातले आमदार उदयसिंह राजपूत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत करू असे देखील आश्वासन दिले होते. मात्र त्यावर चर्चा देखील करण्यात आली नाही. त्यामुळे परिस्थिती चांगली नसतानाही यांना मदतीला येणाऱ्या लोकांची यांना पर्वा नाही का? अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली. इतकेच नाही तर गजानन घोलप यांच्याशी झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप देखील त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणली.

बीआरएस पक्षासोबत काम करणार : तेलंगणा राज्याने कमी काळातच विकासाचे उत्तम मॉडेल समोर आणले. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा असून आगामी काळात पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव सांगतील त्यानुसार आपण पुढची रणनीती आखणार आहोत. इतकेच नाही त्यांनी सांगितले तर कन्नड विधानसभा निवडणुकीत माझी पत्नी संजना जाधव हिच्या विरोधात, तर जालना लोकसभा मतदार संघात माझे सासरे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवायला सांगितली तरी आपण ती लढवू असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

तर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो असतो : उद्धव ठाकरे यांनी आपल्याला प्रतिसाद दिला नसल्याने आपण बीआरएस पक्षात गेलो, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. ते माझ्याकडे आले असेल तर निश्चित उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली असती. मात्र, त्या ठिकाणी आमचे निष्ठावंत आमदार उदयसिंह राजपूत सक्रिय आहेत. सगळे आमदार बाजूला जरी गेले तरी ते एकनिष्ठतेने उभे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आता यांना पुन्हा आमदारकी देणार शक्य होणार नाही. इतकेच नाही तर याआधी हर्षवर्धन जाधव काही पक्षात जाऊन आले आहेत. आता ते नव्या पक्षात गेले आहेत. पाहू काय करतात? अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

हेही वाचा: Maha Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले! तब्बल 'इतके' तास चालले कामकाज; पावसाळी अधिवेशनाची ठरली तारीख

Last Updated : Mar 25, 2023, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.