औरंगाबाद - दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा मिळावा यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर 'भजन-भोजन' आंदोलन केले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून पीकविमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी लागणारे पैसे संपले आहेत. त्यातच पीकविमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन भोजन आंदोलन केले.