ETV Bharat / state

Farmers Protest : दिवाळीच्या दिवशी आमटी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्याकडून सरकारचा निषेध - दिवाळीच्या दिवशी आमटी भाकरी खाऊन दिवाळी साजरी

Farmers Protest : संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीची (Diwali 2023) धामधूम पाहायला मिळत आहे. परंतु मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर गावात शेतकऱ्यांनी आमटी भाकर खाऊन 'काळी दिवाळी' (Celebration Black Diwali ) साजरी केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News
आमटी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 8:00 PM IST

प्रतिक्रिया देताना शेतकरी

छत्रपती संभाजीनगर (गंगापूर) Farmers Protest : दिवाळीत (Diwali 2023) सर्वत्र आनंद उत्सव असताना, यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी 'काळी दिवाळी' (Celebration Black Diwali) ठरत आहे. यावर्षी सरासरीपेक्षाही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. मदत जाहीर करताना सरकारनं सरासर विचार न करता दुष्काळ यादी जाहीर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सणासुदीला गोडधोड न करता शेतकऱ्यांनी शेतात आमटी भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली. तालुक्यासह सगळीकडं सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्यानं, संपूर्ण तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे. कोरडा दुष्काळ जाहीर होणं अपेक्षित होतं, असं असतानाही तालुक्यातील काही मंडळ दुष्काळ यादीतून वगळण्यात आल्यानं, तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी आमटी भाकरी खाऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुष्काळ सदृश्य नको दुष्काळ जाहीर करा : गंगापुरात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पावसाच्या ७५० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशा तालुक्यातील १२ महसूल मंडळांपैकी ८ मंडळात राज्य शासनाकडून १० नोव्हेंबरला दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, गंगापूर तालुक्यात सर्वत्र सारखाच पाऊस पडलेला असताना, इतर चार मंडळांना कोणत्या निकषावर वगळलं? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांना ईमेल करुन निवेदन : गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना मेल करुन 'काळी दिवाळी' साजरी करणार असल्याचं कळवलं होतं. मात्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं वाहेगाव येथील अनंता भडके यांच्या शेतात झोपडीवर आमटी भाकरी खाऊन, डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध करण्यात आला. कापसाचं उत्पादन कमी झालं असताना, सरकार बाहेरून कापसाच्या काठी आयात करुन शेतमालाचे भाव पाडत आहे. तसेच दुधाचा 35 रु दर जाहीर करुन ही सरकारमधील दूध संघाचे संचालक, चेअरमन यांनी मनमानी करुन दुधाचे दर पाडले. तर सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. अवकाळी पावसानं कांद्याच्या नुकसानीचं अनुदान, 300 रु प्रतिक्विंटल शेतकऱ्यांना दिलं नाही. शेतकऱ्यांच्या नशिबानं मिळत असलेल्या कांद्यावर 800 डॉलर निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कलवण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी केली काळी दिवाळी साजरी : यावेळी भाऊसाहेब शेळके, संपत रोडगे, अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, साईनाथ मनाळ, भरत मनाळ, केदार मनाळ, सुदाम दारूंडे, रमेश मनाळ, प्रकाश मानाळ हरिश्चंद्र मनाळ, रवींद्र मनाळ, लक्ष्मण गोरे, विठ्ठल शिंदे, काका कुलकर्णी, कैलास घोडके, नितीन, नितीन मनाळ, किरण मनाळ, संजय पगारे, गोकुळ शिंदे, रमेश हिवाळे, कैलास घोडके, गणेश मनाळ, संजू आहेर, दत्तू तगरे, नरेंद्र मनाळ, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Maratha Protest In Nagpur : नागपुरातही मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण; मुंडन करत सरकारचा निषेध
  2. Maratha Reservation : मराठा आंदोलन चिघळलं! आमदार प्रकाश सोळंकेंच्या कारसह अख्खा बंगलाच पेटवला, पाहा व्हिडिओ
  3. Narayan Rane : मराठा समाजाबद्दल नारायण राणेंचं शिवराळ विधान; मराठा कार्यकर्ते आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.