ETV Bharat / state

साहित्यिक आणि घाटी रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर सुहास जेवळीकर यांचे निधन

डाॅ. जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. इथेच त्यांनी भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. घाटी रूग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Doctor Suhas Jewalikar
Doctor Suhas Jewalikar
author img

By

Published : Feb 27, 2022, 10:31 AM IST

औरंगाबाद - औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि जेष्ठ साहित्यिक डाॅ. सुहास जेवळीकर यांचे निधन झाले. दीर्घ आजारानंतर शनिवारी त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

डाॅ. जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. इथेच त्यांनी भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. घाटी रूग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. घाटी रुग्णालयातच त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. डॉ. सुहास जेवळीकर हे प्रसिद्ध डॉक्टर तर होतेच मात्र मराठीतील प्रख्यात लेखकही होते. त्यांची ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या लेखणाने अनेकांना भुरळ घातली होती. त्यांना राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.