ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या 'या' गावात तब्बल ३० वर्षांनी पोहचली वीज; गावकऱ्यांकडून जल्लोष साजरा

वस्तीतील सर्व लोकांना रेशनकार्ड व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच शिक्षणाचे महत्व पटवून देत वस्तीतील मुलांना शिक्षण घ्यावे, असे आवाहनही गावकऱ्यांना केले.

३० वर्षांनी पोहचली वीज
३० वर्षांनी पोहचली वीज
author img

By

Published : Jun 23, 2021, 1:08 PM IST

Updated : Jun 23, 2021, 1:34 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) - सिल्लोड तालुक्यातील अनाड परिसरातील बरड वस्तीवर मागील 30 वर्षापासून अंधाराचे साम्राज्य होते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची वीज संदर्भात मागणी होती. त्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठ पुरावा केला. शेवटी काही ग्रामस्थांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे ही मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता करण्यात आली असून त्यांच्या निर्देशानुसार बरड वस्तीत पोहचली वीज आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवीन विजेचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्राच्या 'या' गावात तब्बल ३० वर्षांनी पोहचली वीज

विजेचा प्रश्न प्रलंबित
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावालगत नव्याने वसलेल्या बरड वस्ती येथे विजेचा प्रश्न प्रलंबित होता. गावातील नागरिकांनी ही बाब महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आठ दिवसानंतर या वस्तीत वीज पोहचली. सोमवारी ( दि.21 ) रात्री 8 वाजता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते डीपीचा स्विच चालू करून बरड वस्तीतील लोकांना नवीन विजेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मूलभूत सुविधा हा नागरिकांचा अधिकार
खास बाब म्हणून बरड वस्तीतील लोकांच्या नावाने नमुना नंबर 8 दिले जाईल. तात्काळ गावाला नवीन पाणी पुरवठा योजना दिली जाईल. वस्तीतील सर्व लोकांना रेशनकार्ड व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच शिक्षणाचे महत्व पटवून देत वस्तीतील मुलांना शिक्षण घ्यावे, असे आवाहनही गावकऱ्यांना केले. त्याचप्रमाणे या वस्तीला शासकीय सर्व योजनेचा लाभ मिळून द्या, असे निर्देश राज्यमंत्री यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

पाणी आणि घरकुलचा लाभ प्राधान्याने देणार
भविष्यात ज्या ज्या योजना लागतील त्या सर्व योजनेचा लाभ या वस्तीला मिळवून देऊ. गावाचा सर्व्हे करून पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सत्तार यांनी संबंधित विभागला दिल्या आहेत. तसेच तात्काळ गावात नवीन पाण्याच्या टाकीसाठी 10 लाख रूपये दिले जातील. येत्या चार महिन्याच्या आत गावात पाणी आणि ज्यांना घरे नसतील त्यांना घरे मिळवून देऊ, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

रांगोळ्यांची आरास आणि वाजतगाजत स्वागत
वस्तीत वीज येणार व त्यानिमित्ताने मंत्री, जिल्हाधिकारी देखील येणार हे माहीत पडताच सकाळपासूनच वस्तीतील नागरिकांची एखाद्या सण उत्सवा सारखी तयारी सुरू होती. महिला, पुरुष, बाल- गोपालांनी नवीन कपडे परिधान केले होते. तर वस्तीतील प्रत्येक घरापुढे आकर्षक रांगोळ्यांची आरास पहायला मिळाली. सायंकाळी मान्यवरांचे आगमन होताच गावकऱ्यांनी वाजतगाजत त्यांचे स्वागत केले. तर विजेच्या नवीन प्रकाशात विद्यार्थी हौशीने अभ्यास करताना दिसले.

Last Updated : Jun 23, 2021, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.