ETV Bharat / state

भाव नसल्याने शेतकऱ्याने 60 क्विंटल फुलकोबी चक्क रस्त्यावर फेकली

शेतात आलेल्या फुलकोबीला योग्य दर मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने आपली कोबी चक्क रस्त्यावर फेकून दिली. वाल्मिक तांबे (रा. फुलंब्री तालुका), असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या मनावर दगड घेत 60 क्विंटल इतकी कोबी रस्त्यावर फेकून दिली.

Valmik tambe cauliflower damage
फुलकोबी रस्त्यावर फेकली
author img

By

Published : Jan 4, 2021, 10:07 PM IST

औरंगाबाद - शेतात आलेल्या फुलकोबीला योग्य दर मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने आपली कोबी चक्क रस्त्यावर फेकून दिली. वाल्मिक तांबे (रा. फुलंब्री तालुका), असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या मनावर दगड घेत 60 क्विंटल इतकी कोबी रस्त्यावर फेकून दिली.

फुलकोबी रस्त्यावर फेकत असतनाचे दृष्य

कोबीला मिळाला एक रुपया किलोचा दर

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अनंत अडचणींचा सामना करत असतो. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथील वाल्मिक तांबे या शेतकऱ्याने भाज्यांची शेती केली. मोठ्या कष्टाने शेतात कोबीचे पीक घेतले. मात्र, मंडईत कोबीला एक रुपये किलोचा दर सांगण्यात आला. हा दर परवडत नसल्याने वाल्मिक यांनी शक्य तितकी कोबी विकली आणि उर्वरित रस्त्यावर फेकून दिली. वाल्मिक यांनी जालना, औरंगाबाद, भुसावळ, लासूर बाजारात कोबी विक्रीला नेली. मात्र, त्यांना योग्य भाव मिळाला नाही.

हेही वाचा - औरंगाबाद येथे 'पक्ष्यांना वाचवा, नायलॉन मांजाचा वापर टाळा' जनजागृती अभियान

मागील वर्षभरात झाले मोठे नुकसान

नेहमीची पारंपरिक पीके सोडून वाल्मिक आधुनिक शेती करायला लागले. यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या, टरबूज, खरबूज, अद्रक अशी पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केली. मागील वर्षी मोठ्या अपेक्षेने टरबूजचे पीक घेतले, परंतु कोरोनामुळे पिकासाठी लावलेला खर्च देखील वसूल झाला नाही. निघालेला टरबूज बाजारपेठेत विक्रीसाठी नेता आला नाही. मिळेल त्या भावात टरबूज विकावा लागला. तर, शिल्लक राहिलेला टरबूज फेकावा लागला. हीच अवस्था खरबूजची झाली. नुकसान झाल्यावर अद्रकची शेती केली, मात्र अतिवृष्टीमुळे अद्रक देखील खराब झाली आणि त्यामुळे 2 एकरात कोबीचे उत्पादन घेतले. मात्र, त्यातही नुकसान झाले.

भाजीपाल्याला योग्य भाव मिळावा

भाजी बाजारात कवडीमोल भावाने व्यापारी कोबी विकत घेत आहेत. मात्र, ही कोबी ग्राहकांना महाग मिळते. भाजी मंडईत सर्वसामान्यांना कोबी दहा रुपये किलो दराने विकली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून घेताना व्यापारी 1 रुपये किलोचा दर देतो. भाजीपाला बाजारात आणण्यापर्यंत लागणारा खर्च देखील त्यातून निघत नाही. त्यामुळे, किमान 4 रुपयाचा दर तरी मिळायला हवा, असे मत वाल्मिक तांबे या शेतकऱ्याने व्यक्त केले.

हेही वाचा - ...तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करु - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.