औरंगाबाद - पदमपूरा येथील कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर महानगर पालिकेने कारवाई केली आहे. संबंधित डॉक्टर कंत्राटी डॉक्टर असून त्याला बडतर्फ केल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
महिला रुग्ण आणि डॉक्टरमध्ये होता परिचय
डॉक्टरवर आरोप करणारी महिला आणि डॉक्टर हे एकमेकांना परिचित होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास सदरील महिलेला डॉक्टरांनी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ते दोघे जवळपास चाळीस मिनिटं बोलत होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात शरीर संबंध आला नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ - doctor terminated the service of Aurangabad Covid centre
कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर महानगर पालिकेने कारवाई केली आहे. संबंधित डॉक्टर कंत्राटी डॉक्टर असून त्याला बडतर्फ केल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.