गंगापूर (छत्रपती संभाजी नगर) Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनाची धग वाढत असून, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी समाज बांधव आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अंतरवली सराटी येथे सुरू (Maratha reservation issue) असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून शिवाजी गाडे (Shivaji Gade hunger strike) या दिव्यांग तरुणानं कळसुबाई शिखरावर उपोषण सुरू केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलनं सुरू असून, अशाच प्रकारचे लक्षवेधी आंदोलन पैठणच्या दिव्यांग तरुणानं कळसुबाई शिखरावर सुरू केलंय.
कळसूबाई शिखरावर तीन दिवस उपोषण : दिव्यांग तरुणानं सर्वांत उंच कळसुबाईचे शिखर सर करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय. शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) ते रविवारी (२९ ऑक्टोबर) असे सलग तीन दिवस उपोषण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व १५ लाख दिव्यांगांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून हे आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शिवाजी गाडे यांनी दिली.
अनेक गावांमधे नेत्यांना प्रवेश बंदी : मराठा आरक्षणाची धग गेल्या दोन महिन्यांपासून वाढली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत. तर राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घातली असून, अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. ज्या नेत्यांना आमच्या समाजाशी काही देणंघेणं नाही, त्यांनी आमच्याकडं येऊ नये, अशा आशयाचं बॅनर गावातील प्रवेशद्वाराजवळ लावले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी करण्याचं काम मराठा आंदोलकांनी केलंय.
मराठा आरक्षणाचे पोलीस दलातही पडसाद: अनेक राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता, मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
हेही वाचा:
- Manoj Jarange Patil : जरांगेंच्या उपोषणाची धग पोलीस दलापर्यंत; पोलिसांनी दिला राजीनामा...
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, इंद्रायणी नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवली
- Maratha Reservation Row : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; उपोषणाला परवानगी नाकारली