औरंगाबाद - कोरोनामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठा परिणाम झाला आहे. तसाच परिणाम स्पर्म बँक ( Sperm Bank Aurangabad ) म्हणजे वीर्य संकलनावर दिसून आला. इतकंच नाही तर ताण-तणाव आणि बदलेल्या दिनक्रमामुळे वंध्यत्वाचे प्रमाण देखील वाढत असल्याची चिंता स्पर्म बँकच्या गीता आचार्य यांनी व्यक्त केली.
वीर्य संकलन घटले -
वीर्य बँकेत म्हणजेच स्पर्म बँकेत संकलन प्रक्रिया ( Sperm Collection Process ) मंदावली आहे. कोरोना काळात जवळपास 70 टक्क्यांनी संकलनावर परिणाम झाला आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये वाढणारा ताण - तणाव, भीती अशी काही कारणे आहेत. पूर्वी वीर्य संकलनाबाबत होणारी विचारणा आता कमी प्रमाणात होत आहे. देशात स्पर्मची मागणी वाढत आहे. मात्र त्यामानाने संकलन होत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे मत इव्हॅल्यूशन व्हिजिनच्या गीता आचार्य यांनी सांगितले.
महाविद्यालय बंद असल्याने देखील घटले संकलन -
वीर्य दान प्रक्रियेत युवकांचा मोठा वाटा असतो. कोरोनामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. अनेक विद्यार्थी आजही गावाकडेच आहेत. आणि त्यामुळे वीर्य दान आणि संकलन प्रक्रियेत मोठा परिणाम झाला आहे. ही सगळी प्रक्रिया सुरळीत होण्यास अजून विलंब लागण्याची शक्यता आहे.
वंध्यत्व वाढत चालल्याने वाढली चिंता
मागील काही वर्षांमध्ये विशेषतः कोरोना काळापासून पुरुषांमधील वंध्यत्व वाढल्याचं समोर आलं. रोज येणारा ताणतणाव, बदललेली लाइफस्टाइल यामुळे हा परिणाम झाला आहे. स्पम बँकेत येणाऱ्या एका नमुन्यात तीन ते चार सॅम्पल तयार होत असल्याचे. मात्र आता एक किंवा दोनच सॅम्पल तयार होत आहेत इतकंच नाही त्यातील चांगल्या शुक्राणूची संख्या घटलल्याच पाहायला मिळत आहे, अशी माहिती गीता आचार्य यांनी दिली. आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात झोप, कमी ताणतणाव, पौष्टिक आहार असणे आवश्यक असल्याचे मत गीता आचार्य यांनी सांगितलं.