ETV Bharat / state

कन्नड तालुक्यात झाडावर आढळला मृत बिबट्या, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तालुक्यातील आमदाबाद व नाचनवेल या दोन गावांच्या शीवहद्दीत झाडावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. (Dead leopard) मंगलसिंग राजपूत यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर हा बिबट्या आढळून आला आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील फॉरेस्टीलगत हे क्षेत्र असून, या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे झाडावर लटकलेले शव निदर्शनास आले.

कन्नड तालुक्यात झाडावर आढळला मृत बिबट्या

author img

By

Published : Dec 2, 2021, 1:28 PM IST

औरंगाबाद (कन्नड) - तालुक्यातील आमदाबाद व नाचनवेल या दोन गावांच्या शीवहद्दीत झाडावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मंगलसिंग राजपूत यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर हा बिबट्या आढळून आला आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील फॉरेस्टीलगत हे क्षेत्र असून, या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे झाडावर लटकलेले शव निदर्शनास आले. घटनेची शहानिशा करण्यासाठी वनविभागाकडून याठिकाणी कर्मचारी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आठवड्यापूर्वी एक बिबट्या जेरबंद (Dead leopard in kannad talika)

कन्नड परिसरात सहा दिवसांपूर्वी पुंडलिक बनकर यांच्या शेतात बिबट्या शिकार करताना विहिरीत पडला होता. या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. पोलीस व वनविभाग यांनी राबविलेल्या संयुक्त मोहिमेत बिबट्याचे प्राण वाचवण्यात यश आले होते.

दोन बिबट्यांच्या वावर असल्याची शक्यता

नाचनवेल आणि कन्नड परिसरात दोन बिबट्यांव्यतिरिक्त अजून एका बिबट्याचा वावर असल्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. विहिरीतील बिबट्याला येथून हलवल्यानंतर शेतात काम करणारे मजूर व ट्रॅक्टर चालकांनी याठिकाणी दुसरा बिबट्या असल्याचे सांगितले होते. (Dead leopard in kannad talika) सदर वन जमिनीलगत नाचनवेल, आमदाबाद, आडगाव व मोहाडी गावांचे शिवार असून ही गावे या क्षेत्रापासून चार ते पाच किमी अंतरावर आहेत. लागोपाठ दोन बिबटे आढळल्याने व एकाच्या मुक्त वावरामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.