औरंगाबाद - सिल्लोड नगरपरिषदेमध्ये बुधवारी संध्याकाळी हंगामी महिला कर्मचाऱ्यांचा थकीत पगार ठेकेदाराने न दिल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २५ लोकांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशाखा गायकवाड, महेश शंकरपल्ली, रफिक शेख, गणेश शंकरपल्ली, भाजपचे शहराध्यक्ष कळमेश कटारिया यांच्यासह २५ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी नगरपरिषदेमध्ये येऊन कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - गंगापूरात अवैध दारूचा साठा जप्त; गंगापूर पोलिसांची धडक कारवाई
त्याच्या पगाराशी नगरपरिषदचा संबंध नाही -
महिला कर्मचाऱ्याचा पगार ठेकेदाराकडे बाकी असून त्याचा नगरपरिषदेशी काहीही संबंध नाही. या प्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार दिल्याचे मुख्याधिकारी रफिक सय्यद यांनी सांगितले.
हेही वाचा - तंबाखूजन्य पदार्थासह मोटार जप्त, दोघे अटकेत