ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांत पार पडणार मतमोजणी प्रक्रिया - 26 rounds

मतमोजणीसाठी शहरात मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुमारे १६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. यात शहर पोलिंसासह केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील. विशेष म्हणजे उद्या मतमोजणीनंतर कुठल्याच उमेदवाराला मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबादमध्ये ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांत पार पडणार मतमोजणी प्रक्रिया
author img

By

Published : May 22, 2019, 9:37 PM IST

औरंगाबाद - लोकसभा मतदार संघात एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले असून २३ उमेदवार व नोटा अशा २४ उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. २३ मे ला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान खासदार विरोधात तीन विद्यमान आमदार अशी ही लढत असणार आहे.

औरंगाबादमध्ये ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांत पार पडणार मतमोजणी प्रक्रिया

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी २३ मे ला चिकलठाणा एमआयडीसी येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारातील इमारतीत होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. त्यानंतर ८:३० वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले आहे. २३ उमेदवार व नोटा (आभासी उमेदवार) अशा २४ उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. एकूण मतदानापैकी एक षष्ठांश म्हणजेच सुमारे १,९९,००० मत मिळवणारा उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकणार आहे. मतमोजणीसाठी शहरात मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुमारे १६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. यांत शहर पोलिंसासह केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील. विशेष म्हणजे उद्या मतमोजणीनंतर कुठल्याच उमेदवाराला मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Intro:औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकुण ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले असुन २३ उमेदवार व नोटा ( आभासी उमेदवार ) अशा २४ उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. २३ मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाईल. Body:२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान खासदार विरोधात तीन विद्यमान आमदार अशी हि लढत असणार आहे. Conclusion:औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी उद्या २३ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारातील इमारतीत होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनीधींसमोर सुरक्षित कक्ष उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असुन प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. त्यानंतर ८:३० वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रीयेला सुरुवात होणार असुन ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकुण ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले असुन २३ उमेदवार व नोटा (आभासी उमेदवार) अशा २४ उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. एकुण मतदानापैकी एक षष्ठांश म्हणजेच सुमारे १,९९,००० मत मिळवणारा उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकणार आहे. मतमोजणीसाठी शहरात मतमोजणीकेंद्राच्या परीसरात सुमारे १६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. यांत शहर पोलिंसासह केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील. विशेष म्हणजे उद्या मतमोजणीनंतर कुठल्याच उमेदवाराला मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार नाही असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.