कन्नड (औरंगाबाद) - कन्नड तालुक्यामध्ये आज 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी हतनूर येथे 7, जवखेडा बु. येथे 1, उंबरखेडामध्ये 1 येथील रहिवासी आहे. तेथील संबंधित रुग्णांचे राहते घर, रस्ते, गाव, भाग प्रतिबंधित केलेले आहे. आजपर्यंत कन्नड तालुक्यामध्ये एकूण 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 37 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
13 रुग्णांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. 9 रुग्णांवर नाशिक येथे उपचार चालू आहेत. 42 रुग्णाचा उपचार ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे चालू आहे आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कन्नड शहरांमध्ये आजपर्यंत 41 रुग्ण व ग्रामीण भागात 63 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना परिस्थिती -
जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1361 स्वॅबपैकी 159 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 79 पुरुष, 80 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 108 वर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 342 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 303 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.