ETV Bharat / state

कोरोनाग्रस्त मुलाच्या उपचारासाठी मातेवर मंगळसूत्र विकण्याची वेळ, औरंगाबादमधील स्थिती बिकट

author img

By

Published : Mar 25, 2021, 4:28 PM IST

Updated : Mar 25, 2021, 10:26 PM IST

सरकारी कोविड केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरून औषधे आणण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. मेलट्रॉन कोविड केंद्रामध्ये बायकोचे मंगळसूत्र विकून मुलावर उपचार करण्याची वेळ एका बापावर आल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे, परिणामी सरकारी कोविड केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरून औषधे आणण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. मेलट्रॉन कोविड केंद्रामध्ये बायकोचे मंगळसूत्र विकून मुलावर उपचार करण्याची वेळ एका बापावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गोर-गरिबांनी उपचार घ्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

औरंगाबाद

मेलट्रॉन कोविड केंद्रामध्ये सात दिवसांपूर्वी सुखदेव गोरे यांच्या मुलाला कोरोनाच्या उपचारांसाठी दाखल केले. महानगरपालिकेचे रुग्णालय असल्याने पैसे लागणार नाहीत, असे वाटले मात्र मुलगा उपचारासाठी दाखल होताच, सुखदेव यांच्या हातात औषधांचा कागद डॉक्टरांनी देत बाहेरून औषधे आणायला सांगितली. औषध दुकानात जाताच दुकानदारांनी साडेतीन हजारांचे बिल दिले. ते कसेबसे भरून रुग्णालयात औषधे पोहचवली. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी औषधे आणायला सांगितली. त्यावेळी पाहुण्यांकडून पैसे उधार घेत औषधे आणली. दोन दिवसांनी पुन्हा औषधे आणायला सांगितल्यावर औषधे कशी आणायची? असा प्रश्न पडल्याने हताश झालेल्या सुखदेव गोरे यांनी आपल्या पत्नीचे मणी-मंगळसूत्र आणि जोडवी पाच हजारांमध्ये विकले आणि औषधे आणली. मात्र, आता औषधे आणावी लागली तर करायचे काय? असा प्रश्न गोरे यांना पडला. ही परिस्थिती एकट्या वृद्ध बापाची नाही तर कोविड केंद्रामध्ये दाखल अनेक रुग्णांची आहे. दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत असल्याचे वास्तव आहे.

रुग्णांना आणावी लागतात बाहेरून औषधे..

औरंगाबाद शहरात सध्या 14 कोविड केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून सध्याची आकडेवारी पाहता, रोज सतराशे ते अठराशे नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा ताण हा वाढतच चालला असल्याने रुग्णांना उपचार मिळावे याकरिता, नवीन कोविड केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शहरात रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी 31 मंगल कार्यालये प्रशासन ताब्यात घेणार आहे. त्या ठिकाणी कोविड केंद्रांची उभारणी केली जाणार असून, लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्या ठिकाणी हलविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा आवश्यक रुग्णांना मिळावे याकरिता कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना इतरत्र हलविण्यात येणार आहे. कोविड केंद्राची उभारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असली तरी, त्या ठिकाणी मिळणारी औषधे कशी उपलब्ध होतील? हा खरा प्रश्न निर्माण होत आहे.

मनपा आयुक्तांनी पाळले मौन..

कोविडच्या रुग्णांना औषधे उपलब्ध होत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना भेटून औषधाच्या तुटवड्याबाबत जाब विचारला असता, त्यांनी औषध सध्या उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयात औषधे देणे शक्य होत नसल्याचे उत्तर दिले. मात्र, परिस्थिती कधी पूर्ववत होईल किंवा गरीब रुग्णांना महानगरपालिकेच्या कोरोना केंद्रामध्ये मोफत औषध कधी मिळतील? याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेच्या भरवशावर असलेल्या रुग्णांना उपचार मिळतील कसे आणि कोरोनाच्या महामारीत ते आपला बचाव कसा करू शकतील? असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : Mar 25, 2021, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.