छत्रपती संभाजीनगर Police Raid : छत्रपती संभाजीनगर शहरात उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत विदेशी तरुणीसह इतर दोघींची सुटका करण्यात आली. हा अड्डा चालवणारा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून एजंट म्हणून वेगवेगळ्या भागातील मुलींना शहरात आणून वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिलीय.
मध्यवस्तीत सुरु होता कुंटणखाना : सिडको पोलिसांना शहरातील बीड बायपास परिसरातील सेना नगरमध्ये एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सिडको पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकानं परिसरात जाऊन कारवाई केली असता, उच्चभ्रू कुंटणखाना सुरु असल्याचं निदर्शनास आलं. या कारवाईत एक विदेशी तरुणी आणि इतर दोन तरुणी तिथं आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी तुषार राजन राजपूत, प्रवीण बालाजी कुरकुटे, गोपाल वैष्णव, लोकेशकुमार केशमातो आणि अर्जुन भुवनेश्वर डांगे यांना अटक केलीय. या कारवाईत बंगल्यात उझबेकिस्तान येथील तरुणीही आढळून आली आहे. ती भारतात कशी आली, कोणत्या कारणानं तिनं परवानगी काढली असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत सखोल चौकशी केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच झाली होती अशीच कारवाई : दोन दिवसांपुर्वीच सिडको पोलिसांनी सिडको परिसरात एका कोचिंग क्लासेसमध्ये सुरु असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त केला होता. एकाच इमारतीत कोचिंग क्लासेस आणि त्याच ठिकाणी कुंटणखाना सर्रास चालू होत होता. कोचिंग क्लासेसच्या इमारतीत हा व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी छापा मारुन कारवाई करत काही ग्राहकांना अटक करुन तरुणींची सुटका केली होती. या कारवाईत अटक असलेल्या एका आरोपीकडून सातारा परिसरातील कुंटण खाण्याबाबत माहिती मिळाली. त्यावरुन सिडको पोलिसांनी शिताफीनं उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखाना उद्ध्वस्त केला.
हेही वाचा :