ETV Bharat / state

HSC Exam : उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल, बोर्डाने पाठवली नोटीस - 12th HSC Exam

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरात बदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात त्यांचे म्हणणे जाणुन घेण्यासाठी बोलवण्यात आले होते.

HSC Exam
HSC Exam
author img

By

Published : May 9, 2023, 5:04 PM IST

विद्यार्थी प्रतिक्रिया देतांना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना खुलासा देण्यासाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात बोलवण्यात आले होते. मात्र, आलेल्या विद्यार्थीनी बदलेले हस्ताक्षर आमचे नाही, अशी माहिती दिल्याने इतक्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत बदल केला कोणी असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या प्रकरणी चौकशी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती बोर्डकडून देण्यात आली.

फिजिक्स उत्तर पत्रिकेत झाला बदल : मागील महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न झाली. यात कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी अभियान राबवण्यात आले. अस असले तरी, विद्यार्थ्यांच्या फिजिक्सच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचा समोर आले. विद्यार्थ्यांनी जिथे उत्तर पत्रिका लिहून सोडली, त्यापुढे काही प्रश्नांचे उत्तर लिहिण्यात आले. तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्धवट उत्तर लिहिलेली आहेत, त्यापुढे दुसऱ्या अक्षरात उर्वरित उत्तर लिहिण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थ्यांना कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी आंबेजोगाई तालुक्यातील तीन महाविद्यालयांची जवळपास 100 विद्यार्थी आपले म्हणणे मांडण्यासाठी आले होते. मात्र, सर्वांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल होता. विशेष म्हणजे सर्वांचा फिजिक्स विषयाच्या उत्तर पत्रिकेतच हा बदल दिसून आला. त्यामुळे नेमके उत्तर पत्रिकेत बदल केला कोणी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

विद्यार्थ्यांकडून लिहून घेतला कुबुल नामा?: उत्तर पत्रिकेत अक्षरात असलेल्या बदलांमुळे अंबाजोगाई येथील तीन वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्यासाठी बोर्डात बोलवण्यात आले. यात विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका दाखवून नेमके अक्षर बदल आहे का? याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले. जर अक्षर ज्यांचा नसेल तर त्याबाबत त्यांच्याकडून लेखी उत्तर लिहून घेण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत, आमचे अक्षर बदलले कसे? असा प्रश्न उपस्थित केला. इतकंच नाही तर, ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत खुलासा केला आहे, त्यांना तुमचे निकाल उशिरा लागू शकतात असं बोर्डाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यात आमची चूक काय असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. जे काही चौकशी असेल ती लवकर करून, नियमित वेळेवर निकाल लावावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी पालकांनी केली आहे.

चौकशी नंतर निर्णय होईल : याबाबत उच्च माध्यमिक बोर्डाला विचारले असता ही नियमित प्रक्रिया असून, दरवर्षी असे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. त्यावेळी नेमका बदल का झाला याबाबत विद्यार्थ्यांकडून खुलासा मागवला जातो. हा पहिला टप्पा असतो, यानंतर तेथील परीक्षा केंद्रप्रमुख, प्राचार्य यांच्याकडे देखील या प्रकरणाबाबत विचारणा केली जाते. जर विद्यार्थ्यांची चूक असेल तर पुढील कारवाई होते. मात्र, याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यावरच निर्णय होईल अशी माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादच्या) केंद्रावर चार दिवस वेगवेगळ्या केंद्रांवरील विद्यार्थ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलावलेले आहे असे देखील परीक्षा मंडळाच्या सचिव आणि उपसचिवानी सांगितले.

  • हेही वाचा -
  1. Major Road Accident In MP : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये प्रवासी बस पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू
  2. Sharad Pawar News : सामनातील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
  3. Jitendra Awhad On The Kerala Story: द केरळ स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या - जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.