ETV Bharat / state

बनावट कागदपत्रे वापरुन महामंडळाची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 21, 2021, 4:33 PM IST

Updated : Feb 21, 2021, 4:53 PM IST

बनावट कागदपत्रे दाखवून वसंतराव नाईक आर्थिक महामंडळाचे कर्ज घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे

औरंगाबाद - महिलेने बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड (शिधापत्रक) आदी कागदपत्रे तयार करुन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाचे कर्ज काढले व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी रेखा रामदास डोंगरे, विष्णू भागवतसह तिघांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिका माहिती अशी, रेखा डोंगरे या महिलेने औरंगाबादेत सन 2010-11 दरम्यान ब्युटिशियनचा कोर्स केला. या काळात रेखाची विष्णूसह ओळख झाली. त्यानंतर तिने इंडस् हेल्थ प्लसची डिस्ट्रीव्यटरशीप घेतली. त्यात विष्णू भागवतला कामास घेतले. या कामात रेखाची विवाहीत बहिणही तिला मदत करत होती. याच काळात रेखा रामदास डोंगरे या महिलेने रेखा रामदास राठोड या नावाने बनावट निवडणूक ओळखपत्र, शिधापत्र, उत्पन्नाचा दाखला तयार करुन घेतला. त्यानंतर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेत शासनाची फसवणून केली. यात विष्णू भागवत व तिची बहिणी या दोघांनी तिला मदत केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलाी आहे.

हेही वाचा - औरंगाबाद: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

Last Updated : Feb 21, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.