औरंगाबाद - जिल्हातील कन्नड शहारात एका फर्निचर दुकानाबाहेर ( Furniture shop) गावठी बॉम्ब आढळून आला. दुकानात बॉम्ब आढळल्याने सर्वत्र शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, बॉम्ब शोधक ( Bomb Squad ) पथकाला पाचरण केले. त्यानंतर फथकाने बॉम्ब नष्ट ( Bomb destroyed ) केला. मात्र, बॉम्ब नष्ट करतेवेळी त्यांचा स्फोट झाला. शहरातील चाळीसगाव रोड वरील किरण राजगुरू यांच्या मालकीची विश्वकर्मा फर्निचर ( Furniture shop) दुकान आहे. रोजच्या नित्य नियमाने राजगुरू सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकाना बाहेर एक मोबाईलचा बाॅक्स त्यांना आढळून आला. दुकानदाराला संशयस्पद वस्तू आढळ्याने त्यांनी याची माहिती कन्नड पोलिसांना दिली.
फर्निचर दुकानासमोर आढळाला बॉम्ब - शहरातील चाळीसगाव रोड वरील किरण राजगुरू यांच्या मालकीची विश्वकर्मा फर्निचर दुकान आहे. ते रोजचा नित्य नियमाने सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाबाहेर एक मोबाईलचा बाॅक्स त्यांना आढळून आला. त्यांनी बाॅक्स उघडला असता त्यात संशयास्पद वस्तू दिसली. राजगुरू यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी धाव घेतली.
बॉम्ब नष्ट करतांना स्फोट - स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती बॉम्ब शोधक पथकाला दिली. काही वेळात बॉम्ब शोधक पथक कन्नड शहरात दाखल झाले. तोपर्यंत बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्यांसारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनी गर्दी हटवल्यानंतर बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरु केली. तब्बल आडीच तास बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने शंभर मीटर अंतरावर मोकळ्या जागेत बॉम्ब नेऊन नष्ट केल. यावेळी बॉम्बचां जोरदार स्फेट ( bomb exploded ) झाला. गावठी बॉम्ब असल्याने मोठी हानी होण्यची शक्यता होती असे, पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती घेण्यासाठी औरंगाबादचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी घटना स्थळी भेट देऊन सर्व आढावा घेतला. या प्रकरणी जलत गतीने तपास करण्यात येईल असे ते म्हणाले.
हेही वाचा- Rajya Sabha Election 2022 : 'सर्व गणितं ठरलेली, विजय आमचाच' होणार- संजय राऊत