ETV Bharat / state

मेहबूब शेखला अटक का नाही? बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचे आंदोलन

author img

By

Published : Dec 31, 2020, 7:32 AM IST

Updated : Dec 31, 2020, 7:39 AM IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, असे असताना त्यांच्या अद्याप कारवाई झाली नसल्याचा निषेध करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण फास्ट ट्र्रक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.

bjp protest
बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचे आंदोलन

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. बुधवारी क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनावेळी भाजपा युवमोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

मेहबूब शेखवर कारवाई नसल्याने भाजप आक्रमक..

मेहबूब शेख यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने भाजप आक्रमक झाली आहे. मेहबूब शेखला अटक का केली जात नाही? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक करावी, आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मेहबूब शेखला अटक का नाही? बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचे आंदोलन
शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल...

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खासगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब शेख यांच्यावर करण्यात आला आहे. सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे, १४ नोव्हेंबरला मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता, मेहबूब नावाची व्यक्ती कार घेऊन त्या ठिकाणी उभी होती. तरुणी मागील सीटवर बसली असता, त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

पोलीस आयुक्तांची सावरासावर...

औरंगाबाद सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी गुन्हा माझ्यावर दाखल झाला नसून माझ्यासारखे नाव असणाऱ्या व्यक्तीवर दाखल झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी थेट उत्तर न देता. हा संवेदनशील गुन्हा आहे या प्रकरणांमध्ये आम्ही तपास करत आहोत, असे गोलमाल उत्तर देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे या गुन्ह्यातील नक्की आरोपी कोण? या विषयी संशय कायम आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.