औरंगाबाद - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 2018 मध्ये घडलेल्या घटनेनंतर दोन वर्षांनी अशा पद्धतीने कारवाई म्हणजे राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप भाजपने केला.
क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन -
अतिशय खेदाची आणि निंदनीय गोष्ट सरकारने केली. सरकारचा पर्दाफाश करण्याचे काम ज्या पत्रकाराने केले. त्या चौथ्या स्तंभाला मुळापासून उघडायचे काम सरकार करत आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. हुकूमशाहीला आणि दडपशाहीला जाब विचारण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत, आगामी काळात तुमचीही मुस्कटदाबी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला. राज्यात तिघाडी सरकार असून, कायदा स्वतःचा असल्या प्रमाणे त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला.