ETV Bharat / state

कचऱ्याची समस्या; सिल्लोडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन - Nagar Parishad

सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या दूर न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन करण्यात आले.

सिल्लोडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:33 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या दूर न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मधील समतानगर, शिवाजीनगर, शिक्षक कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, वाघवाडी, सपकाळवाडी या परिसरात नगर परिषद निवडणुकीनंतर हेतू पुरस्सर नगर परिषदेमार्फत घंटागाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक घरातील कचरा आसपासच्या परिसरात टाकत असल्याने दुर्गंधी वाढली होती.

सिल्लोडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन

त्यामुळे २४ तासाच्या आत हा परिसर कचरामुक्त न केल्यास परिसरातील डुक्कर पकडून नगर परिषद कार्यालयात सोडून आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेविका अश्विनी पवार व रुपाली मोरेल्लू यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदनाद्वारे दिला होता.

निवेदन देऊनही परिसरात स्वच्छता न झाल्याने किरण पवार, मनोज मोरेल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी डुकरांची पिले सोडून आंदोलन करण्यात आले.

Feed on what's app

औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील समस्या दूर न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्लं सोडली. प्रभागात नागरिकांची काम होत नसल्याने नगर परिषद कार्यालयामध्ये डूक्कर सोडून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या नगरसेविका अश्विनी पवार व रुपाली मोरेल्लू यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंगळवार रोजी निवेदनाद्वारे दिला होता. प्रभाग क्रमांक तीन मधील समतानगर, शिवाजीनगर, शिक्षक कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, वाघवाडी, सपकाळवाडी या परिसरात नगर परिषद निवडणूकीनंतर हेतू पुरस्सर नगर परिषदेमार्फत घंटागाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील
नागरिक घरातील कचरा आसपासच्या परिसरात टाकत असल्याने दुर्गंधी वाढली होती. चोवीस तासाच्या आत हा परिसर कचरामुक्त न केल्यास परिसरातील
डूक्कर पकडून नगर परिषद कार्यालयात सोडण्याचा इशारा दिल्या नंतरही परिसरात स्वच्छता न झाल्याने किरण पवार, मनोज मोरेल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवार रोजी डुकरांची पिले सोडून आंदोलन केले. 

Amit
Aurangabad
9923082004

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.