ETV Bharat / state

औरंगाबाद : वाढत्या उन्हाने केळीची बाग सुकली, वादळानेही केले नुकसान

दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे गांधेली येथील सय्यद अख्तर यांची केळीची बाग उद्धवस्त झाली. सय्यद अख्तर या शेतकऱ्याने दिड एकर शेतात केळीची बाग लावली होती.

वाढत्या उन्हामुळे सुकली केळीची बाग
author img

By

Published : Apr 30, 2019, 4:20 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावात अतिउष्णतेमुळे केळीची बाग सुकली आहे. एवढेच नाही, तर वादळामुळेहे या बागेला फटका बसला आहे.

वाढत्या उन्हामुळे सुकली केळीची बाग

दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे गांधेली येथील सय्यद अख्तर यांची केळीची बाग उधवस्त झाली. सय्यद अख्तर या शेतकऱ्याने दिड एकर शेतात केळीची बाग लावली होती. केळीचे पीक घेण्यासाठी त्यांनी आपल्या बहिनीकडून आणि मित्रांकडून एक लाख २० हजार रुपये उधार घेतले होते. कमी पाण्यात शेती जगावी यासाठी अख्तर यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला हाता.

गेल्या १५ दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर असल्याने केळीचे पीक सुकत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून केळीचे पीक कसेबसे जगवले. ठेकेदार येऊन केळी पाहून गेला सौदा ठरला, १५ दिवसात केळी काढून पैसे येणार आणि उधारी फिटणार म्हणून सय्यद अख्तर आनंदी होते. मात्र रविवारी सायंकाळी अचानक सुसाट वादळी वारा सुटला आणि त्या वादळाने केळीची बाग उध्वस्त झाली. दोन हजार झाडांपैकी अवघी २०० ते २५० झाडे वाचली. आता उसनवारी फेडायची कशी, असा प्रश्न सय्यद अख्तर यांना पडला आहे.

शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी सरकारी यंत्रणा दोन दिवसांनी जागी झाली. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी केळीच्या झालेले नुकसानाची पाहणी केली आहे. अंदाजे ६ लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असून अहवाल शासनाकडे पाठवल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी दिली.

Intro:औरंगाबादेत उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वसामान्यांना दुपारी बाहेर पण नाही अवघड होत असताना, दुसरीकडे अतिउष्णतेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

Body:औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावात अतिउष्णतेमुळे केळीचे पीक अडचणीत सापडला होता त्यातच मोठं झालं आणि केळीचे पीक उद्ध्वस्त करून गेलं.

Conclusion:दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने गांधेली येथील सय्यद अकत्त्तर यांची केळीची बाग उधवस्त झाली. सय्यद अकत्त्तर या शेतकऱ्याने दिड एकर शेतात केळीची बाग लावली. केळीच पीक घेण्यासाठी त्यांनी आपल्या बहिनीकडून आणि मित्रांकडून एक लाख वीस हजार उधार घेतले. कमी पाण्यात शेती जगावी यासाठी सय्यद अकत्त्तर यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. मात्र उन्हाचं पारा चढला. गेली 15 दिवसांपासून उन्हाचा पारा 40 डिग्रीच्या वर असल्याने केळी सुकू लागली. पाण्याचं नियोजन केल्याने केळीच पीक कसंबसं जगवल. ठेकेदार येऊन केळी पाहून गेला सौदा ठरला, पंधरा दिवसात केळी काढून पैसे येणार आणि उधारी फिरणार म्हणून सय्यद अकत्त्तर आनंदी होते. मात्र रविवारी सायंकाळी अचानक सुसाट वादळी वारा सुटला, आणि त्या वादळाने केळीची बाग उध्वस्त झाली. 2000 झाडांपैकी अवघी 200 ते 250 झाड वाचली. त्यांचा फायदा मात्र होणार नसल्याने उसनवारी फेडायची कशी असा प्रश्न सय्यद अकत्त्तर यांना पडलाय.

byte - सय्यद अकत्त्तर - शेतकरी

झालेलं नुकसान पाहण्यासाठी सरकारी यंत्रणा दोन दिवसांनी जागी झाली. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी केळीचे झालेले नुकसानाची पाहणी केली. अंदाजे 6 लाखांचे नुकसान झालं असल्याचा अंदाज असून अहवाल शासनाकडे पाठवल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी दिली.

byte - राजेंद्र बागडे - मंडळ अधिकारी

गेल्या काही महिन्यांपासून भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांचं जगण अवघड झालं आहे. त्यात शेतकरी नियोजनबद्ध शेती करण्याचा प्रयत्न करत असताना निसर्गाची साथ मिळत नसल्याने बळीराजा हताश होत आहे. या हताश शेतकऱ्याला सरकारी यंत्रणातरी मदत पुरवेल का? हेच पाहण्यासारखं असेल.

(make special pkg)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.