ETV Bharat / state

Aurangzeb Tomb Controversy : ...म्हणून आहे औरंगजेबाची खुलताबाद येथे कबर, स्वतःच्या पैशातून केला होता दफनविधीचा खर्च

author img

By

Published : May 18, 2022, 7:07 PM IST

Updated : May 19, 2022, 2:40 PM IST

औरंगजेबाने ( Aurangzeb ) खुलताबाद येथे माझी कबर असावी आणि ते देखील माझ्या कष्टाच्या पैशातून असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्यांची कबर खुलताबाद येथे हजरत जैनुद्दीन सिरादी यांच्या दर्ग्यात करण्यात ( Aurangzeb tomb at Khultabad ) आली. मात्र या कबरीवरून महाराष्ट्रात नेहमीच वाद उभवले ( Aurangzeb Tomb Controversy ) आहेत.

Aurangzeb Tomb Controversy
औरंगजेबाची खुलताबाद येथे कबर

औरंगाबाद - खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर ( Aurangzeb tomb at Khultabad ) नेहमीच वादात ( Aurangzeb Tomb Controversy ) राहिली. औरंगजेबाने खुलताबाद येथे माझी कबर असावी आणि ते देखील माझ्या कष्टाच्या पैशातून असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्यांची कबर खुलताबाद येथे हजरत जैनुद्दीन सिरादी यांच्या दर्ग्यात करण्यात आली. अशी माहिती इतिहासतज्ञ संजय पाईकराव यांनी दिली.

खुलताबाद येथे आहेत मुस्लिम संतांच्या दर्गा - खुलताबाद तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. कारण तेथे मुस्लिम संतांच्या दर्गा आहेत. धार्मिक महत्व असलेली पवित्र जागा अशी खुलताबादची ओळख आहे. त्या ठिकाणी बुऱ्हाणुद्दीन ओलिया, हजरत मुलती जिब जरजरी बक्ष आणि औरंगजेबाचे गुरु हजरत जैनुद्दीन सिरादी यांच्या दर्गा आहेत. त्यामुळे ही जागा अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे माझ्या गुरुच्या मला मृत्युनंतर मला दफन करावे अशी इच्छा औरंगजेब यांची होती. नगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर त्यांना खुलताबाद येथे दफन करून कबर उभारण्यात आली होती. अशी माहिती इतिहासतज्ञ संजय पाईकराव यांनी दिली.

स्वतःच्या पैश्यातून दफनविधी - राजा औरंगजेबाचे तक्त्त देशभरात होते. त्याला पैश्यांची कमतरता असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असे असले तरी ते त्यांच्या खजिन्यातील एकही पैसा घेत नसत, स्वतःचा खर्च ते स्वतःच्या पैशातून भागवत होते. औरंगजेबाचे लिखाण चांगले होते. उर्दू आणि पारसी भाषा त्यांना उत्तम अवगत होती. ते स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात कुराण लिहायचे, आणि वेश बदलून ते बाजारात जायचे, तिथे लिहिलेली कुराण विकून पैसे कमवत असत आणि त्याच पैश्यांमधून त्यांचा दफनविधी पार पडला होता. राजा महाराजांच्या कबर अत्यंत चांगल्या पद्धतीने होत्या. मात्र माझी कबर अगदी साधी असावी अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार अतिशय साधी कबर तयार करण्यात आली होती. मात्र नंतर इंग्रज देशात आल्यावर त्यांनी कबरीचे सुशोभीकरण केले होते अशी माहिती इतिहासतज्ञ संजय पाईकराव यांनी दिली.

हेही वाचा - Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहितीची कबर

Last Updated : May 19, 2022, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.