ETV Bharat / state

औरंगाबादची 'माझी स्मार्ट सिटी बस' देशात अव्वल - Aurangabad's 'Mazi Smart City bus' tops in country

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद येथील माझी स्मार्ट बसने देशात अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस २०२० जिंकल्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तांनी याचे श्रेय औरंगाबादकरांना दिले आहे.

Aurangabad's 'Mazi Smart City bus' tops in country
औरंगाबादची 'माझी स्मार्ट सिटी बस' देशात अव्वल
author img

By

Published : Jun 26, 2021, 1:33 PM IST

औरंगाबाद - केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाराच्या 'स्मार्ट सिटी बस'ने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस-२०२० जिंकल्याची घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी केली. हा पुरस्कार पटकवणाऱ्या औरंगाबादने सूरत आणि अहमदाबाद सारख्या शहरांना मागे टाकले आहे.

औरंगाबादची 'माझी स्मार्ट सिटी बस' देशात अव्वल

स्मार्ट सिटीज मिशनच्या 6 व्या वर्धापन दिनी पुरस्कार जाहीर -

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाली होती. यावेळी औरंगाबाद येथील माझी स्मार्ट बसने देशात अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस २०२० जिंकल्याची घोषणा केली आहे.

आयुक्तांनी श्रेय दिले औरंगाबादकरांना -

पुरस्कार बद्दल बोलताना मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीम चे अभिनंदन केले आणि यशस्वीतेसाठी सर्व भागधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “स्मार्ट बससाठी पुरस्काराचे श्रेय औरंगाबादमधील नागरिकांनाच आहे. त्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा व स्मार्ट बसच्या डिजीटल सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

87 लाखाहून अधिक प्रवाश्यांना सेवेचा दिला लाभ -

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये माझी स्मार्ट बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. 100 बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प 32 मार्गांवर पोहोचतो. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल 22 हजार किलोमीटरचे अंतर व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण 52 लाख किलोमीटर धावताना 87 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवेचा लाभ दिला आहे. जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असताना स्मार्ट सिटी बसने एका दिवसात 15 हजार प्रवाशांना सेवा दिली आहे. तर सर्व बसेस कार्यरत असल्यास ही संख्या 25 हजार पर्यंत वाढेल.

कोविड काळातही दिली सेवा -

कोविड -१९ साथीच्या आजारामुळे बससेवेला मोठा फटका बसला आहे. तरी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि औरंगाबाद महानगरपालिकेने कोविड रुग्णवाहिका म्हणून बसचा वापर केला. या कालावधीत बसेसने आरोग्य कर्मचारी आणि कोविड रुग्णांची वाहतूक करून 4 लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतर व्यापले आहे. नोव्हेंबरमध्ये कोविड -१९ लॉकडाऊननंतर नवीन डिजिटल अवतारामध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड, बस ट्रॅकिंग मोबाइल अॅप अशा नवीन व आकर्षक योजना आणि सुविधांसह बससेवा सुरू करण्यात आली. शहरात १५० स्मार्ट बस थांबे आणि ४०० चिन्हांचे खांब बस सेवेला पूरक ठरणारे आहेत. माझी स्मार्ट बस सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या एका कार्डाद्वारे नागरिक वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा वापरू शकतात.

यांचा आहे मुख्य सहभाग -

माझी स्मार्ट बस प्रकल्प मनपाचे माजी आयुक्त आणि एएससीडीसीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निपुण विनायक ह्यांचा प्रयत्नाने सुरु करण्यात आले होते. एएससीडीसीएलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी, मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर, डेप्युटी मॅनेजर सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक विशाल खिल्लारे, प्रोजेक्ट असोसिएट रुशिकेश इंगळे, सहाय्यक मॅनेजर (लेखा व प्रशासन) माणिक निला, सहाय्यक व्यवस्थापक विलास काटकर, माजी उप-व्यवस्थापक (चालन आणि देखभाल) ललित ओस्तवाल, माजी उपव्यवस्थापक (ऑपरेशन्स) एमआर खिल्लारे यांनी पहिल्या दिवसापासून माझी स्मार्ट बस प्रकल्पात काम केले आहे.

हेही वाचा - औरंगाबाद : लवकरच सुरू होणार 'सिटी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर'; अमिताभ कांत यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.