औरंगाबाद -गेल्या काही दिवसांपासून शहरातील घरफोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावर शहर पोलिसांतर्फे कोण कोणत्या उपाय योजना राबविल्या जातात हे ईटीवी ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी जुन्याच पद्धतीचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांकडे आधुनिक यंत्रणा नाही. मात्र, येत्या काही दिवसात आधुनिक यंत्रणा उभारणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे सरत्या वर्षाच्या घरफोड्यांच्या आलेख जैसे थे असल्याचे चित्र आहे.
घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून जुन्याच यंत्रणेचा वापर - Aurangabad police news
औरंगाबाद शहरात २००६ ते २०१५ या काळात सुरक्षित घर योजना राबवली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी हो योजना राबविली होती. यात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात एक नोंद पुस्तक ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना बाहेरगावी जायचं असेल त्यांना या नोंदवहीत माहिती द्यावी लागत होती.
![घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून जुन्याच यंत्रणेचा वापर घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10212162-572-10212162-1610439396728.jpg?imwidth=3840)
घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा