औरंगाबाद - सिल्लोड आणि परिसरात गेल्या 10-12 दिवसांपासून परतीच्या पावसाची संततधार कायम असल्याने औरंगाबाद-जळगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. शनिवारी रात्री या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने फसल्याने इतर वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गाळात फसलेले हे मोठे वाहन जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने काढण्यात आली.
हेही वाचा - जनतेच्या हितासाठी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार - रोहित पवार
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्याच्या कामाला विलंब झाल्याने उन्हाळ्यात वाहनधारकांना धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच दिवाळीच्या सुटीत अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होताना दिसत आहे.
हेही वाचा - आयईएस परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला
दिवाळी सण आणि सर्वत्र सुट्या लागलेल्या असल्याने बसने प्रवाशांची वर्दळ दिसत आहेत. मात्र, रस्त्याच्या अडचणींमुळे बस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यात आणि बसस्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. याच मार्गावर सिल्लोड पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. हैदराबाद, गुजरात तसेच इंदौरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मोठी वाहने या रस्त्याने नेहमी ये-जा करतात.