ETV Bharat / state

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक: 53 उमेदवारांपैकी 8 अर्ज बाद - पदवीधर निवडणूक ओरंगाबादमध्ये ८ अर्ज बाद

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत 8 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ही माहिती दिली

Aurangabad Graduate Constituency Election
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:19 PM IST

औरंगाबाद - राजकीय वर्तुळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी बंड होत आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण 53 अर्ज छाननी अंती 45 वैध ठरले. तर 8 अर्ज पात्र ठरविण्यात आले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.

भाजपच्या एक बंडखोरांचा अर्ज बाद तर दोन जण अद्याप मैदानात -

भाजपने शिरीष बोराळकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्यानंतर भाजपत इच्छुकांनी बंड केले. त्यामुळे प्रबळ दावेदार असलेले प्रवीण घुगे यांच्यासह माजी आमदार जयसिंग गायकवाड आणि बीडचे रमेश पोकळे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला होता. त्यापैकी शपथ न घेतल्याने प्रवीण घुगे यांचा अर्ज बाद झाला आहे. आता जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांचे बंड शमवण्याचे आव्हान पक्ष आणि अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासमोर असणार आहे.

महाविकास आघाडीत इच्छुकांनी केली बंडखोरी -

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. असे होत असताना युवासेनेचे अक्षय खेडकर तर घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेतर्फे सचिन ढवळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या दोघांची उमेदवारी मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

मतदार बांधून ठेवण्यासाठी एमआयएम लढवणार निवडणूक -

औरंगाबादसह मराठवाड्यात एमआयएम पक्षाचे वाढते मतदार पाहता उच्चशिक्षित मतदार बांधून ठेवण्यासाठी एमआयएम पक्षदेखील पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. कुणाल खरात यांनी पक्षातर्फे निवडणूक अर्ज दाखल केला आहे. नांदेड महानगर पालिकेनंतर औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदान पक्षाने मिळवत मोठा मतदार पक्षाशी जोडला आहे. त्यामुळे मतदार आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीत आपलं नशीब अजमवणार आहे.

हेही वाचा- लक्ष्मी पुजनानिमित्त आज शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग, जाणून घ्या माहिती

हेही वाचा- ...तर तुमचे सांगाडे बाहेर निघतील - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.