औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती. ज्यात भाऊसाहेब तळमळे यांच्या आई सरपंच पदासाठी (Attack on Nationalist Youth District President) निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यात त्यांचा विजय देखील झाला होता. दरम्यान याच निवडणुकीचा राग मनात ठेवून (political dispute) विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब तरमळे गंभीर जखमी झाले असून; त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती ( Aurangabad Crime News ) चिंताजनक आहे.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल : याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल (case registered against accused) करण्यात आला आहे. अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव पैठण) असे आरोपींचे नावे आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव : बोकुड जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळतात बिडकीन पोलीस ठाण्यातील पथकाने गावात धाव घेतली. त्यानंतर जखमी तरमळे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. गावात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजकीय वातावरण चिरघळण्याची चिन्हे : गेल्या अनेक दिवसांपासुन औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होतांना दिसत आहे. मात्र आता चक्क राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षावरच हल्ला झाल्याने, परत एकदा पोलिसांचा शहरात वचक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच भाऊसाहेब तरमळे यांची प्रकृती गंभीर असल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.